AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोटोतील चिमुकली बॉलिवूडची ‘लेडी सुपरस्टार’, 80 च्या दशकात राहत होती लिव्ह इनमध्ये, हृदयद्रावक निधनाने खळबळ

80 च्या दशकात लिव्ह इनमध्ये राहत असलेल्या अभिनेत्रीचा विवाहित अभिनेत्यावर जडला जीव; 'ती' घटना आणि फोटोत दिसणाऱ्या अभिनेत्रीचं निधन

फोटोतील चिमुकली बॉलिवूडची 'लेडी सुपरस्टार', 80 च्या दशकात राहत होती लिव्ह इनमध्ये, हृदयद्रावक निधनाने खळबळ
| Updated on: Jun 13, 2023 | 10:18 AM
Share

मुंबई | बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी ८०, ९० च्या दशकात समाजाची पर्वा न करता फक्त आपल्या भावनांना महत्त्व दिलं आणि  स्वतःच्या अटी, शर्तींनुसार जीवन व्यतीत केलं. आज ८०, ९० च्या दशकातील अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय नसल्यातरी त्यांची चर्चा मात्र कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते. अभिनेत्रींचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता देखील अशाच एका अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दिसणाऱ्या चिमुकलीने ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं. पण तिच्या आयुष्यात एक असं वळण आलं, ज्यामुळे अभिनेत्रीला आपले प्राण गमवावे लागले. पण आज इतक्या वर्षांनंतर देखील बॉलिवूडच्या ‘लेडी सुपरस्टार’ला चाहते विसरू शकले नाहीत. फोटोमध्ये दिसणाऱ्या चिमुकलीला ओळखणं कठीण आहे..

८०, ९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये पदार्पण, वैवाहित अभिनेत्यासोबत प्रेमसंबंध, लिव्ह ईनरिलेशनशिपमध्ये राहण्याचा घेतलेला निर्णय… इत्यादी गोष्टीमुळे ‘लेडी सुपरस्टार’ चर्चेत राहिली. सध्या सोशल मीडियावर ज्या चिमुकलीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री स्मिता पाटील आहेत. स्मिता पाटील आज जिवंत नसल्यातरी त्यांच्या आयुष्यातील अनेक घटना चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.

स्मिता पाटील यांचे नाव बॉलीवूडच्या सशक्त अभिनेत्रींमध्ये घेतले जाते, ज्यांनी अनेक महिलांवर आधारित सिनेमांमध्ये काम केले. स्मिता पाटील त्यांच्या सिनेमांपेक्षा राज बब्बर यांच्यासोबतच्या नात्यामुळे जास्त चर्चेत होत्या. १९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पलके’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान राज आणि स्मिता एकमेकांच्या फार जवळ आहे. पण तेव्हा राज बब्बर विवाहित होते.

विवाहित राज बब्बर आणि स्मिता पाटील यांच्या नात्याची चर्चा तुफान रंगली. त्यानंतर राज बब्बर आणि स्मिता पाटील यांनी लिव्ह ईनरिलेशनशिपमध्ये राहण्याचा घेतलेला निर्णय… कालांतराने राज बब्बर आणि स्मिता पाटील यांनी लग्न केलं. लग्नानंतर स्मिता पाटील यांनी एका मुलाला जन्म दिला. पण डिलीव्हरी दरम्यान आलेल्या अडचणींमुळे स्मिता पाटील यांचं हृदयद्रावक निधन झालं..

वयाच्या ३१ व्या वर्षी स्मिता पाटील यांनी अखेरच्या श्वास घेतला. राज बब्बर आणि स्मिता पाटील यांच्या मुलाचं नाव प्रतीक बब्बर आहे. प्रतीक बब्बर देखील बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. नुकताच प्रतीकने सोशल मीडियावर एक पोस्ट करत नाव बदलल्याची घोषणा केली. प्रतीक पाटील बब्बर.. असं नाव असल्याची घोषणा केली..

Follow Us
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?