या आहेत बॉलिवूडच्या सिंगल मदर्स, ज्यांनी घटस्फोटानंतर मुलांना एकट्याने वाढवले, कोण आहेत या सुपर मॉम्स?
बॉलिवूडमध्ये अशा बऱ्याच 'सुपर मॉम्स' आहेत ज्यांनी आपल्या मुलांना एकट्याने सांभाळलं आहे. घटस्फोटानंतर स्वत:चं करिअर आणि मुले असा दोन्ही गोष्टी सांभाळणाऱ्या या सिंगल मदर आहेत. या अभिनेत्रींचे आजही याबाबत कौतुक होताना दिसतं. कोण आहेत या 'सुपर मॉम्स' जाणून घेऊयात.

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचे अफेअर्स,लग्न,घटस्फोट सर्वाधिक चर्चेत राहिले. आणि सध्या या अभिनेत्री ‘सिंगल मदर’ आहेत. याअभिनेत्री घटस्फोटानंतर आपल्या मुलांचा एकट्याने सांभाळ करतायत. अनेक अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी अनेक आव्हानांवर मात करत एकट्याने आपल्या मुलांना वाढवत आहेत. जाणून घेऊयात बॉलिवूडच्या या ‘सुपर मॉम्सबद्दल’
बॉलिवूडच्या या ‘सुपर मॉम्स’
करिश्मा कपूर: यातील पहिलं नाव जे कायमच चर्चेत असंत ते म्हणजे करिश्मा कपूर. करिश्मा ही बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. 90 च्या दशकात करिश्मा बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींमध्ये होती. तिने उद्योगपती संजय कपूरशी लग्न केले होते, परंतु परस्पर मतभेदांमुळे हे नाते फार काळ टिकू शकले नाही. पतीपासून वेगळे झाल्यापासून, करिश्मा तिच्या दोन मुलांचे, मुलगी समायरा आणि मुलगा कियानचे संगोपन एकटीच करत आहे.
सुष्मिता सेन: मिस युनिव्हर्स रिहलेली तथा बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने अद्याप लग्न केलेले नाही. पण, ती सध्या तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. सुष्मिता सेन देखील सिंगल मदर आहे. तिने रेनी आणि अलिशा या दोन मुलींना दत्तक घेतले आहे. त्यांना तिने एकटीनेच वाढवलं आहे.
कोंकणा सेन शर्मा: बॉलिवूड अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा देखील सिंगल मदर आहे. अलिकडेच, तिने अभिनेता रणवीर शोरेशी अधिकृतपणे घटस्फोट घेतला आहे. कोंकणा केवळ तिच्या करिअरची जबाबदारी घेत नाही तर ती तिच्या मुलालाही चांगल्या प्रकारे वाढवत आहे.
नीना गुप्ता: बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता देखील सिंगल मदर राहिल्या आहेत. त्यांनी मुलगी मसाबाला एकट्यानेच वाढवलं आहे. त्यामुळे त्यांना सिंगल मदर म्हणूनच ओळखलं जातं. नीना यांचे वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्ससोबत अफेअर होते त्यानंतर त्यांनी मुलगी मसाबाला जन्म दिला.
अमृता सिंग: अमृता सिंगने 1991 मध्ये सैफ अली खानशी लग्न केले, परंतु परस्पर मतभेदांमुळे दोघांनी 2004 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून अमृताने तिच्या दोन्ही मुलांना सारा अली खान आणि मुलगा इब्राहिम अली खान एकट्याने वाढवलं आहे.
चित्रांगदा सिंह: बॉलीवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंहने 2001 मध्ये ज्योती रंधावाशी लग्न केले. तिला त्याच्यापासून एक मुलगा आहे. पण नंतर ते एकमेकांपासून वेगळे झाले, तेव्हापासून चित्रांगदा तिच्या मुलाला एकटीच वाढवत आहे.
