अभिषेकला बोलावून चुकी केली…, अमिताभ बच्चन यांना का होतोय पश्चाताप; Video व्हायरल

Abhishek Bachchan: अभिषेक बच्चन बद्दल वडील अमिताभ बच्चन यांना का होतोय पश्चाताप? बिग बी म्हणाले, 'अभिषेकला बोलावून चुकी केली...', Video व्हायरल... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांच्या वक्तव्याची चर्चा...

अभिषेकला बोलावून चुकी केली..., अमिताभ बच्चन यांना का होतोय पश्चाताप; Video व्हायरल
| Updated on: Nov 15, 2024 | 1:40 PM

Abhishek Bachchan: बॉलिवूडचे महानायक कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील बिग बी यांचा मुलगा अभिषेक बच्चन याच्यासोबत एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर, व्हिडीओ ‘कोन बनेगा करोडपती 16’ शोमधील आहे. केबीसी शोमध्ये अनेक सेलिब्रिटी त्यांच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी येत असतात. नुकतात अभिनेता अभिषेक बच्चन देखील आगामी ‘आय वॉन्ट टू टॉक’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी आला होता. पण अभिषेक शोमध्ये आल्याचा पश्चाताप बिग बी यांना झाला. सध्या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोनी टीव्हीने ‘कौन बनेगा करोडपती 16’ चा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिषेक वडिलांची खिल्ली उडवताना दिसत आहे. ‘भोपू न बजे और हमे मिले समय और हम जीते 7 करोड’ असं म्हणत अभिषेक हात वर करत 7 करोड ओरडताना दिसतो.

 

 

पुढे अभिषेक म्हणतो, ‘आपण सगळे, संपूर्ण कुटुंब एकत्र बसून जेवतो. तेव्हा कोणी प्रश्न विचारल्यास सगळी मुलं मिळून ओरडतात 7 करोड…’ यावर अमिताभ बच्चन म्हणतात, ‘याला याठिकाणी बोलावून मी मोठी चूक केली आहे…’ सध्या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अभिषेक बच्चन याच्या आगामी ‘आय वॉन्ट टू टॉक’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा शूजित सरकार यांनी दिग्दर्शित केला आहे. सिनेमा 22 नोव्हेंबर 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

 

 

अभिषेक बच्चन याच्या सध्या प्रोफेशनल आयुष्याच्या रंगत असल्या तरी अभिनेता खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. अभिषेक आणि पत्नी ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण दोघांनी देखील नात्यावर अधिकृत घोषणा केली नाही. बच्चन कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं.