Rahul Roy | अभिनेता राहुल रॉय याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ, हे प्रकरण भोवण्याची शक्यता

इतकेच नाही तर आता धनंजय गलानी यांनी राहुल रॉयला थेट नोटीस पाठवली आहे.

Rahul Roy | अभिनेता राहुल रॉय याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ, हे प्रकरण भोवण्याची शक्यता
| Updated on: Nov 19, 2022 | 9:50 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता राहुल रॉय आणि चित्रपट निर्माता धनंजय गलानी यांच्यामधील वाद काही कमी होण्याचे चिन्ह दिसत नाहीयेत. यांच्यामधील वाद सतत वाढताना दिसतोय. इतकेच नाही तर आता धनंजय गलानी यांनी राहुल रॉयला थेट नोटीस पाठवली आहे. धनंजय यांनी राहुलवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे या आरोपावर राहुल रॉय यानेही प्रतिक्रिया दिली आहे. धनंजयने ऑगस्ट 2020 मध्ये राहुल रॉयला शॉर्ट फिल्मसाठी साइन केले होते. यावरूनच हा वाद सुरू झालाय.

शॉर्ट फिल्मसाठी अगोदर धनंजय यांनी राहुल यांना 50 हजार रूपये दिले होते. शूट पूर्ण झाल्यावर 1 लाख परत देणार होते. मात्र, राहुलने पैसे परत न केल्याने कायदेशीर नोटीस पाठवण्यात आलीये.

धनंजय यांनी फक्त सात दिवसांसाठी या शाॅर्ट फिल्ममध्ये राहुलला घेतले होते. मात्र, काही कारणामुळे या फिल्मची शूटिंग त्यावेळी होऊ शकली नाही. हा प्रोजेक्ट सतत पुढे ढकलला गेला.

धनंजय म्हणाले की, नोव्हेंबर 2020 मध्ये राहुल यांना ब्रेन स्ट्रोक आला, त्यानंतर मी त्याला काॅल केला नाही. कारण मला त्याला त्रास द्यायचा नव्हता. काही दिवसांनी मी शेवटी राहुलला काॅल केला.

राहुलने मला स्पष्ट शब्दात सांगितले की, मी पुढील दोन महिने आराम करणार आहे. त्यानंतर आपण शूटचे बघूयात. मात्र, त्यानंतर मी काही दिवसांनी परत राहुलला काॅल केला.

यानंतर राहुल याने या शाॅर्ट फिल्ममध्ये काम करण्यास नकार दिला आणि पैसे परत देतो, असेही सांगितले. मात्र, अजूनही मला राहुलने पैसे दिले नाहीयेत, हे खरे आहे.

यावर राहुलने सांगितले की, मला त्यांचे पैसे परत करायचे आहेत. इतकेच नाही तर मी हळूहळू काम करण्यास सुरूवात केलीये. मला थोडा वेळ हवा आहे आणि त्यांचे पैसे मी लवकर देणार आहे.