कधी काळी अभिनेत्रीनं दिले इमरान हाश्मीसोबत किसिंग सीन; आता आहे भारताच्या या स्टार क्रिकेटरची पत्नी

भारतीय क्रिकेट टीमच्या अनेक खेळाडूंनी बॉलिवूड अभिनेत्रींसोबत लग्न केलं आहे. आज आपण अशाच एका क्रिकेटर्सबद्दल माहिती घेणार आहोत.

कधी काळी अभिनेत्रीनं दिले इमरान हाश्मीसोबत किसिंग सीन; आता आहे भारताच्या या स्टार क्रिकेटरची पत्नी
| Updated on: Mar 03, 2025 | 8:00 PM

भारतीय क्रिकेट टीमच्या अनेक खेळाडूंनी बॉलिवूड अभिनेत्रींसोबत लग्न केलं आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याचा देखील या यादीमध्ये समावेश होतो. हरभजन सिंगने 2015 साली बॉलीवूडची अभिनेत्री गीता बासरा सोबत लग्न केलं. गीता बासरा लग्नापूर्वी चित्रपटांमध्ये काम करत होती. हरभजन सिंगला ती खूपच आवडली. त्यानंतर त्या दोघांनी 2015 साली लग्न केलं, जाणून घेऊयात त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल

टीम इंडियाने 2007 मध्ये आपला पहिला टी20 वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर गीता बासराने हरभजन सिंगला फोन करून त्याचं अभिनंदन केलं होतं. त्यानंतर हरभजन सिंगने गिताला आयपीएल सामने बघण्यासाठी निमंत्रण दिलं.मात्र ती आयपीएल सामने बघण्यासाठी जाऊ शकली नाही. मात्र त्यानंतर काही दिवसांमध्येच ते दोघे एकमेकांना भेटू लागले. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. हरभजन सिंगने गीताला प्रपोज केलं. मात्र तेव्हा या नव्या नात्यासाठी गीता तयार नव्हती, तीला आपल्या करिअरची चिंता वाटत होती.

मात्र त्यानंतर गीता बासराने हरभजन सिंगला लग्नसाठी होकार दिला. 2015 मध्ये त्यांनी लग्न केलं. गीताचा जन्म ब्रिटनमध्ये झाला. तीने आपल्या एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, एक वेळ अशी होते की हरभरजन सिंगला होकार द्यावा की नाही याबाबत माझ्या मनात शंका होती. कारण मी माझ्या करिअरबाबत खूप चिंतेत होते. तसेच त्यावेळी मी क्रिकेटर्स संदर्भात वेगवेगळ्या अफवा देखील ऐकल्या होत्या.

गीताने अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे.तीने अभिनेता इमरान हाश्मीसोबत किसिंग सीन देखील दिले आहेत. इमरान हाश्मीने द ट्रेन चित्रपटामध्ये तीच्यासोबत रोमान्स केला होता. तसेच तिने त्याच्यासोबतच संग दिल दिया है या चित्रपटात देखील काम केलं आहे. तीने दहा पेक्षा अधिक चित्रपटात काम केलं आहे. हरभरजन सिंगने 2015 मध्ये तिच्याशी लग्न केलं आहे, हरभजन सिंगने आता क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. दोघांचा संसार आनंदात सुरू आहे.