
अभिनेत्री नताशा स्टेनकोविक आणि क्रिकेटर हार्दिक पंड्या या दोघांचा घटस्फोट झाल्याची अफवा सोशल मीड्यावर वाऱ्याच्या वेगाने पसरली आहे. नताशा आणि हार्दिक या दोघांचीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या दोघांच्या घटस्फोटाची फक्त अफवा आहे की आणखी काही? हे प्रत्येकाला जाणून घ्यायची उत्सुतकता लागली आहे. दोघांमध्ये बिनसलं आहे की नाही,याबाबत अद्याप अजूनही काही स्पष्ट झालेलं नाही. मात्र दोघांच्या वैवाहिक आयुष्याची सोशल मीडियावर चर्चा रंगलेली असताना अभिनेत्री नताशा हीचा एक थ्रोबॅक व्हीडिो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वैवाहिक जीवनाबाबत चर्चा असताना अनेक जण नताशाचा हा व्हीडिओ पाहत आहेत.
अभिनेत्री नताशाचा व्हायरल होणारा व्हीडिओ हा ‘ढिश्कियाऊं’ या सिनेमातील आहे. हा सिनेमा आजपासून 10 वर्षांआधी 2014 साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात हरमन बावेजा, सनी देओल, शिल्पा शेट्टी, आयशा खन्ना आणि नताशा स्टेनकोविक ही स्टार कास्ट प्रमुख भूमिकेत होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपेक्षित गल्ला मिळवू शकला नाही. मात्र नताशाचा व्हीडिओ तुफान व्हायरल झाला होता. या व्हीडिओत नताशा हरमन बावेजा दिसत आहेत. नताशाचा हा व्हीडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हीडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. “मला हार्दिकसाठी वाईट वाटतंय”, असं एका नेटकऱ्यांनी म्हटलंय. अशा अनेक प्रतिक्रिया या व्हीडिओवर येताना दिसत आहेत.
अभिनेत्री नताशाचा ‘ढिश्कियाऊं’ सिनेमातील व्हीडिओ व्हायरल
दरम्यान नताशाला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार, विवाहबाह्य संबंधांमुळे नताशाचं हार्दिकसोबत खटकल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत कोणताही ठोस पुरावा नाही. काही दिवसांपू्र्वी नताशा पब्लिक प्लेसमध्ये स्पॉट झाली होती. तेव्हा नताशाला घटस्फोटच्या चर्चेबाबत प्रश्न करण्यात आले. नताशा यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेली.