या अभिनेत्रीचं वय 46 पण, डीपनेक आणि ट्रान्सपरंट जम्पसूटमधलं सौंदर्य तर पाहा

पूजा बत्राने अनेक बाॅलिवूड चित्रपटांमध्ये जबरदस्त कामगिरी केलीये. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पूजा पडद्यापासून थोडी दूर आहे.

या अभिनेत्रीचं वय 46 पण, डीपनेक आणि ट्रान्सपरंट जम्पसूटमधलं सौंदर्य तर पाहा
| Updated on: Oct 28, 2022 | 1:20 PM

मुंबई : बॉलिवूडमधील ‘विरासत’ चित्रपटातून स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अर्थात पूजा बत्राने नुकताच आपला 46 वा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केलाय. मात्र, पूजाच्या बर्थडे पार्टीपेक्षाही तिच्या बोल्ड लूकची चर्चा सर्वत्र रंगत आहे. 46 व्या वर्षी देखील पूजाचा ग्लॅमरस पाहून सर्वचजण अचंबित झाले आहेत आणि या वयातही इतका बोल्डनेस कसा हा प्रश्न अनेकांना पडलाय. पूजाच्या बर्थडे पार्टीतील काही फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.

पूजा बत्राने अनेक बाॅलिवूड चित्रपटांमध्ये जबरदस्त कामगिरी केलीये. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पूजा पडद्यापासून थोडी दूर आहे. चाहत्यांना पूजाचा बोल्डलूक पाहून मोठा धक्काच बसलाय. पूजा नेहमीच सोशल मीडियावर व्यायाम आणि योगा करत असतानाचे अनेक फोटो  शेअर करते. पूजाने आपल्या फिटनेसकडे खूप लक्ष दिले आहे.

बर्थडे पार्टीत पूजाच्या लूककडेच सर्वांचा नजरा होत्या. पार्टीत पूजाने डीपनेक गळा आणि ट्रान्सपरंट जम्पसूट घातला होता. या जम्पसूटमध्ये पूजाचा लूक एकदम बोल्ड दिसत होता. 46 वर्षात पदार्पण केल्यानंतरही पूजा जबरदस्त बोल्ड दिसत आहे. या बर्थडे पार्टीत पूजा पती आणि अभिनेता नवाब शाहसोबत आली होती. नवाब आणि पूजाचे बर्थडे पार्टीतील फोटो व्हायरल होत आहेत.