AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बालपणी नाव बदलून शाळेत जायची अभिनेत्री श्रुती हसन, तुम्हाला माहितीये का यामागचं कारण?

साऊथचा सुपरस्टार कमल हसनची मुलगी श्रुती हसनने (Shruti Haasan) वयाच्या अवघ्या चारव्या वर्षी बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ती सध्या 35 वर्षांची आहे आणि तिने तेलुगू आणि तमिळ चित्रपट तसेच हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

बालपणी नाव बदलून शाळेत जायची अभिनेत्री श्रुती हसन, तुम्हाला माहितीये का यामागचं कारण?
Shruti Haasan
| Edited By: | Updated on: Oct 07, 2021 | 8:02 AM
Share

मुंबई : साऊथचा सुपरस्टार कमल हसनची मुलगी श्रुती हसनने (Shruti Haasan) वयाच्या अवघ्या चारव्या वर्षी बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ती सध्या 35 वर्षांची आहे आणि तिने तेलुगू आणि तमिळ चित्रपट तसेच हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. हेच कारण आहे की, तिचे चाहते दक्षिण भारत आणि उत्तर भारतात दोन्ही टिकाणी तिला पसंत करतात. इन्स्टाग्रामवरही तिचे प्रचंड चाहते आहेत. तिच्या अभिनयाबरोबरच श्रुती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत आहे. ती तिच्या चाहत्यांपासून काहीही लपवत नाही. अनेकदा ती स्वतःशी संबंधित गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत राहते. श्रुती तिचा बॉयफ्रेंड शंतनू हजारिकासोबतचे फोटोही शेअर करते.

अलीकडेच तिने बॉयफ्रेंडसोबत एक फोटो शेअर केला होता, ज्यात दोघेही फर्निचरच्या दुकानात दिसत होते. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती मेकअप आणि फिल्टरशिवाय दिसत आहे. तिच्या या फोटोवर त्याच्या चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

म्हणून बदलले नाव!

‘लक’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या श्रुतीला मात्र हिंदी चित्रपटसृष्टीत फारसे यश मिळाले नाही. पण यानंतरही तिचे चांगले फॅन फॉलोइंग आहे. तिची गायकीची कारकीर्दही चांगली होती. श्रुती हसन लहानपणी तिचे नाव बदलून शाळेत जायची. या मागचे कारण सुद्धा खूप रंजक आहे. खरं तर, तिला असे वाटायचे की, तिच्या मित्रांना हे कळू नये की, ती एका सुपरस्टारची मुलगी आहे. शाळेत तिने स्वतःचे नाव पूजा रामचंद्रन असे ठेवले होते.

बालकलाकार म्हणून सुरुवात

श्रुतीने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आणि वयाच्या चौथ्या वर्षी तिचे वडील कमल हसन दिग्दर्शित ‘हे राम’ चित्रपटात छोटी भूमिका केली. 2011मध्ये, श्रुतीला तेलुगु चित्रपट ‘अनगनागा ओ धीरुडू’ आणि तमिळ चित्रपट ‘7 ओम अरिवु’ साठी सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

श्रुती एक उत्तम गायिका देखील आहे. तिला सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायकाच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले आहे. तिने संगीत दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. श्रुतीने 2009 मध्ये ‘द एक्स्ट्रामेंटल्स’ नावाने स्वतःचा संगीत बँड तयार केला.

रेस्टॉरंटमध्ये गायची गाणी

श्रुती हसनचे वडील कमल हसन बॉलिवूड आणि साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार असू शकतात, पण श्रुतीला तिचा स्वतःचा संघर्ष होता. तिने एकदा सांगितले होते की, चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी ती मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये गात असे. श्रुती हसन म्हणाली की, ‘मी जुहूच्या एका रेस्टॉरंटमध्ये गाणी गायची. मी कोण आहे हे तिथल्या कोणालाही माहित नव्हते’. ती पुढे म्हणाली, ‘त्या काळात मी सेलीन डिऑन आणि ब्रायन अॅडम्स गाणी गात असे. पण मी कोण आहे आणि कोणाची मुलगी आहे याची कोणालाच कल्पना नव्हती.’

हेही वाचा :

‘तू माझ्यासाठी सगळं काही आहेस…’, 11 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय ‘बिग बॉस OTT’ फेम झीशान!

Nora Fatehi | मनोरंजन विश्वात येण्यापूर्वी नोरा फतेही करायची ‘हे’ काम, अनुभव सांगताना म्हणाली…

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.