AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरबाज खानच्या लग्नानंतर थेट मलायका अरोरा म्हणाली, मी झोपेतून उठले अन्…

काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे विदेशात धमाल करताना दिसले. मलायका अरोरा हिचे काही खास फोटो अर्जुन कपूर याने शेअर केले. नुकताच आता अरबाज खान याने दुसऱ्यांदा लग्न केले आहे. लग्नानंतर मलायका अरोरा हिने इंस्टा स्टोरीला एक पोस्ट शेअर केली आहे.

अरबाज खानच्या लग्नानंतर थेट मलायका अरोरा म्हणाली, मी झोपेतून उठले अन्...
Arbaz Malika
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Dec 29, 2023 | 8:43 PM
Share

मुंबई : मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या घटस्फोटानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. मात्र, मलायका अरोरा हिने किंवा अरबाज खान यांनी कधीच त्यांच्या घटस्फोटाचे नेमके कारण काय हे सांगितले नाही. मलायका अरोरा हिने अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर ती अर्जुन कपूर याला डेट करत आहेत. इतकेच नाही तर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे कायमच एकमेकांसोबतचे खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.

अरबाज खान याच्या लग्नाला मलायका अरोरा ही हजर नव्हती. मात्र, तिचा आणि अरबाज खानचा मुलगा अरहान खान उपस्थित होता. नुकताच मलायका अरोरा हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. आता या पोस्टची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. अनेकांनी या पोस्टचा आणि अरबान खान याच्या लग्नाची संबंध जोडला आहे.

मलायका अरोरा हिने इंस्टा स्टोरीला एक पोस्ट शेअर करत लिहिले की, मी उठले, माझ्याजवळ घालण्यासाठी कपडे, पिण्यासाठी पाणी, खाण्यासाठी अन्न, मी आभारी आहे. आता मलायका अरोरा हिची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. मलायका अरोरा हिची ही पोस्ट बरेच काही बोलून जाताना दिसत आहे.

नुकताच मलायका अरोरा हिने तिच्या लग्नाबद्दल देखील मोठा खुलासा केलाय. मलायका अरोरा हिला दुसऱ्यांदा लग्न करणार का? असे विचारण्यात आले. यावर मलायका अरोरा थेट म्हणाली की, जर कोणी असेल तर का नाही 100 टक्के करेल. यामुळेच मलायका अरोरा देखील अरबाज खान याच्यानंतर दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार का हा प्रश्न सातत्याने सोशल मीडियावर विचारला जातोय.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना