Aishwarya Rai | एअरपोर्टवर स्पाॅट झाली ऐश्वर्या राय, पाहा सुंदर लूकमधील फोटो…

ऐश्वर्या राय शुक्रवारी सकाळी मुंबई विमानतळावर स्पाॅट झाली होती. कॅमेराकडे पाहून ऐश्वर्याने स्माईल दिली. इतकेच नाही तर गडबडीत तिने काही पोजही दिल्या आहेत.

Aishwarya Rai | एअरपोर्टवर स्पाॅट झाली ऐश्वर्या राय, पाहा सुंदर लूकमधील फोटो...
| Updated on: Sep 24, 2022 | 10:42 AM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) सध्या चर्चित आहे. ऐश्वर्याचा Ponniyin selvan 1 हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ऐश्वर्याने Ponniyin selvan 1 च्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये ऐश्वर्याचा लूक (Look) अप्रतिम दिसत होता. या चित्रपटाचा पहिला भाग 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची स्टोरी एका महान राजावर आधारित आहे. ऐश्वर्याच्या चाहत्यांना तिच्या या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे. हा चित्रपट (Movie) काय कमाल करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

इथे पाहा ऐश्वर्या रायचा व्हिडीओ

सोशल मीडियावर ऐश्वर्या रायचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल

सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या रायचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या मुंबई विमानतळावर दिसत आहे. यावेळी ऐश्वर्याने पांढऱ्या रंगाचा ड्रेस कॅरी केलाय. ऐश्वर्याचा लूक अत्यंत सुंदर दिसत होता. मात्र, यावेळी लोकांच्या नजरा ऐश्वर्याच्या फोनवरील वॉलपेपरकडे होत्या. ऐश्वर्याने तिच्या फोनवर वॉलपेपरवर एका खास व्यक्तीचा फोटो ठेवल्याचे दिसते आहे.

लोकांच्या नजरा ऐश्वर्याच्या फोनवरील वॉलपेपरवर

ऐश्वर्या राय शुक्रवारी सकाळी मुंबई विमानतळावर स्पाॅट झाली होती. कॅमेराकडे पाहून ऐश्वर्याने स्माईल दिली. इतकेच नाही तर गडबडीत तिने काही पोजही दिल्या आहेत. मात्र, खरी चर्चा झाली ती ऐश्वर्याने तिच्या फोनच्या वॉलपेपरवर ठेवलेल्या फोटोची. ऐश्वर्याने तिच्या फोनवरील वॉलपेपरवर  मुलगी आराध्याचा फोटो ठेवल्याचे यावेळी दिसले. सध्या ऐश्वर्या रायचा हा विमानतळावरील व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय.