AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR IPL Playoff: सात पैकी एक सामना जिंकलेल्या केकेआरला प्लेऑफची संधी, कसं काय ते समजून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धा आता प्रत्येक सामन्यानंतर प्लेऑफचं चित्र बदलत आहे. पण कोलकाता नाईट रायडर्स संघाची स्थिती नाजूक आहे. आतापर्यंत फक्त एकाच सामन्यात विजय मिळवला आहे. तरीही उपांत्य फेरीची संधी आहे. कसं काय ते समजून घ्या

KKR IPL Playoff: सात पैकी एक सामना जिंकलेल्या केकेआरला प्लेऑफची संधी, कसं काय ते समजून घ्या
KKR IPL Playoff: सात पैकी एक सामना जिंकलेल्या केकेआरला प्लेऑफची संधी, कसं काय ते समजून घ्या Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 24, 2026 | 7:34 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत जवळपास सर्वच संघांनी 14 पैकी 7 सामने खेळले आहे. या सात सामन्यांच्या खेळात प्लेऑफचं अर्ध चित्र स्पष्ट झालं आहे. पण आता येथून पुढे टॉप 4 मध्ये जागा मिळवण्यासाठी चुरस वाढणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघ येत्या सामन्यात जोर लावणार आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वात सुमार कामगिरीची नोंद ही कोलकाता नाईट रायडर्सच्या नावावर आहे. कारण या संघाने आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकला आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने पदरात 1 गुण पडला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघ गुणतालिकेत 3 गुण आणि -0.879 नेट रनरेटसह सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. त्यामुळे या संघाची प्लेऑफची वाट बिकट झाली आहे. पण संधी अजूनही आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सला उर्वरित सामन्यात चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघ उपांत्य फेरी कशी गाठणार?

आयपीएल 2026 स्पर्धेतील गुणतालिकेचं गणित पाहिलं तर जो संघ 16 गुणांची कमाई करेल त्याला प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी मिळेल. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सकडे उर्वरित सात सामन्यात ही संधी आहे. पण कोलकाता नाईट रायडर्ससाठी येथून पुढे प्रत्येक सामना हा करो या मरोची लढाई असणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सला आता 7 सामने खेळायचे असून प्रत्येक सामन्यात विजय मिळवला तर 14 गुण होतील आणि आधीचे 3 गुण पकडले तर 17 गुणांची कमाई होईल. त्यामुळे प्लेऑफमधील जागा पक्की होईल. सात पैकी एखादा सामना गमावला तर 15 गुण होतील. असं झालं तर गणित जर तर वर येईल. पण काठावर पास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सकडे अजूनही संधी आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचे सामने

  • कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 26 एप्रिल 2026
  • कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 3 मे 2026
  • कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 8 मे 2026
  • कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 13 मे 2026
  • कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 16 मे 2026
  • कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 20 मे 2026
  • कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 24 मे 2026

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले