AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारची शानदार योजना, प्रत्येक महिन्याला मिळेल 5000 रुपयांची पेन्शन, केवळ 210 रुपयांची गुंतवणूक

सरकारच्या अनेक योजना आहे. मात्र, ही योजना असंघटित कामगारांसाठी देखील वरदान आहे. जेवढे लवकर या योजनेत सामील झाले तेवढा मासिक हप्ता कमी होतो. आणि निवृत्तीनंतर 5,000 रुपए मासिक पेन्शन मिळते.

सरकारची शानदार योजना, प्रत्येक महिन्याला मिळेल 5000 रुपयांची पेन्शन, केवळ 210 रुपयांची गुंतवणूक
Senior Citizen
| Updated on: Apr 24, 2026 | 7:25 PM
Share

निवृत्तीची योजना नेहमीच लोक टाळत असतात. मात्र, नंतर म्हातारपणी ही मोठी समस्या बनते. अशात सरकारची अटल पेन्शन योजना ( APY ) त्यांना लोकांसाठी एक सुरक्षित पर्याय आहे, ज्यांना म्हातारपणी नियमित उत्पन्न हवे. खास बाब ही आहे की योजना गॅरंटीड पेन्शन देते आणि यात जोखीम देखील कमी आहे. अटल पेन्शन योजनेत पाच हजार मासिक पेन्शन मिळण्यासाठी गुंतवणूकीची रक्कम वयावर अवलंबून असते. १८ वर्षात २१० रुपये, ३० व्या वर्षी ५७७ रुपये आणि ४० मध्ये १,४५४ रुपये मासिक हप्ता भरावा लागतो. लवकरात लवकर गुंतवणूक सुरु केली तर मासिक हप्त्याची रक्कम कमी होते.

योजनेची लोकप्रियता वाढत आहे

APY योजनेची लोकप्रियतता सतत वाढतच आहे. २१ एप्रिल २०२६ पर्यंत या योजनेत ९ कोटीहून जास्त लोक जोडले गेले आहेत. यामुळे हे स्पष्ट आहे की ही योजना देशातील सामाजिक सुरक्षेचे एक मजबूत साधन होत आहे. खास करुन असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी.

काय आहे अटल पेन्शन योजना ?

ही एक सरकारी पेन्शन स्कीम आहे. जिला पेन्शन फंड रेग्युलेटरी एण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटी ( PFRDA ) संचालित करते. यात तुम्ही १,००० रुपयांपासून ५,००० रुपयापर्यंत मासिक पेन्शन निवडू शकता. जी ६० वर्षांच्या वयानंतर मिळते. तुमची गुंतवणूक तुमचे वय आणि निवडलेली पेन्शन यावर अवलंबून असते. प्रत्येक महिन्याला निश्चित रक्कम तुमच्या खात्यातून ऑटो-डिडक्ट होते. ज्यामुळे बचत करणे सोपे होते.

५००० रुपये पेन्शनसाठी किती गुंतवणूक करावी लागेल ?

१८ वर्षाच्या वयात सुरुवात – दर महिन्याला सुमारे २१० रुपये जाम करावे लागतील. ( दीर्घ काळ ( ४२ वर्षे ) मिळाल्याने मासिक हप्त्याचे ओझे कमी.

३० वर्षाच्या वयात सुरुवात – दर महिने ५७७ रुपये जमा करावे लागतील.

४० वर्षाच्या वयात सुरुवात – दर महिन्याला १,४५४ रुपये जमा करावे लागतील ( कारण गुंतवणूकीचा वेळ केवळ २० वर्षांचा मिळतो. )

यात हे स्पष्ट आहे की जेवढे जास्त लवकर सुरुवात करणार तेवढा मासिक हप्ता कमी असणार आहे.

सर्वांना समान पेन्शन

वय काहीही असो, जर तुम्ही ५,००० रुपये पेन्शन निवडली, तर ६० व्या वयानंतर तुम्हाला दर महिन्याला निश्चित रक्कम मिळले. फरक केवळ एकूण गुंतवणूकीत असेल.

कुटुंबाला देखील मिळतो फायदा

या योजनेचा एक मोठा फायदा की पेन्शनर याच्या मृत्यूनंतर जीवनसाथीला देखील पेन्शन मिळत रहाते. दोघांच्या मृत्यूनंतर सुमारे ८.५ लाख रुपयांचा फंड नॉमिनीला मिळतो.

कोण-कोण लाभ घेऊ शकते ?

१८ ते ४० वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक, ज्याच्याकडे बँक वा पोस्ट ऑफीसमध्ये सेव्हींग अकाऊंट असेल तो या योजनेत सामील होऊ शकतो.

लवकर सुरु करणे का गरजेचे आहे ?

अटल पेन्शन योजनेला ( APY ) सर्वात मोठा संदेश हा आहे की ही योजना लवकर सुरु करावी आणि कमी गुंतवणूकीत सुरक्षित भविष्य बनवता येते. उशीर केल्याने दर महिन्यास जास्त पैसे भरावे लागतात. ही योजना त्या लोकांसाठी चांगली आहे ज्यांना कमी जोखीमेत गॅरंटीड पेन्शन हवी. आणि निवृत्तीनंतर जे आत्मनिर्भर राहू इच्छीतात.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल