AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs GT Toss : आरसीबीची होम ग्राउंडमधील शेवटच्या सामन्यात बॉलिंग, गुजरात विरुद्ध मॅचविनर आऊट

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Toss and Playing 11 : आरसीबीने टॉस जिंकून पाहुण्या गुजरातला बॅटिंगसाठी बोलावलं आहे. गुजरात गतविजेत्या संघासमोर किती धावांचा डोंगर उभारणार? हे पहिल्या डावानंतरच स्पष्ट होईल.

RCB vs GT Toss : आरसीबीची होम ग्राउंडमधील शेवटच्या सामन्यात बॉलिंग, गुजरात विरुद्ध मॅचविनर आऊट
Shubman Gill and Rajat Patidar RCB vs GT TossImage Credit source: IPL X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 24, 2026 | 7:49 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 34 व्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स आमेनसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या मोसमातील सातवा सामना आहे. आरसीबीचा हा होम ग्राउंड अर्थात एम चिन्नास्वामी स्टेडियममधील या मोसमातील शेवटचा सामना आहे. या सामन्याला संध्याकाळी साडे सात वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. आरसीबीने घरच्या मैदानातील शेवटच्या सामन्यात टॉस जिंकला. कॅप्टन रजत पाटीदार याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघांची कामगिरी

आरसीबीने या मोसमात आतापर्यंत 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. आरसीबीने 4 विजय आणि 8 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. तर गुजरातने 6 पैकी 3 सामने जिंकलेत आणि तितकेच गमावलेत. गुजरात पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहे.

आरसीबीची घरच्या मैदानातील कामगिरी

आरसीबीला एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयाचं अर्धशतक पूर्ण करण्याची संधी आहे. आरसीबीने आतापर्यंत स्पर्धेच्या इतिहासात या मैदानात एकूण 100 पैकी 49 सामने जिंकले आहेत. तर आरसीबीला 47 सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय. आरसीबीची घरच्या मैदानातील विजयी टक्केवारी 51 इतकी आहे.

जीटी जिंकणार का?

गुजरातचा बंगळुरुतील हा चौथा सामना आहे. गुजरातने आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकलेत. तर एकमेव सामन्यात पराभूत व्हावं लागलंय.

आरसीबीला मोठा धक्का

आरसीबीचा विस्फोटक फलंदाज फिलिप सॉल्ट याला दुखापतीमुळे गुजरात विरूद्धच्या सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे सॉल्टच्या जागी जेकब बेथेल याचा समावेश करण्यात आला आहे. आरसीबीकडून प्लेइंग ईलेव्हनमध्ये करण्यात आलेला हा एकमेव बदल आहे. तर गुजरातने काही बदल केले आहेत. ऑलराउंडर जेसन होल्डर याचं गुजरातकडून पदार्पण झालंय. तर मानव सुथार याचं प्लेइंग ईलेव्हनमध्ये कमबॅक झालं आहे.

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : साई सुदर्शन, शुबमन गिल (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, जेसन होल्डर, रशीद खान, मानव सुथार, कागिसो रबाडा आणि मोहम्मद सिराज.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कॅप्टन), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हीड, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, सुयश शर्मा आणि रसिक सलाम दार.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल