AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs GT Live Streaming : गुजरातसमोर आरसीबीचं आव्हान, कोण जिंकणार?

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans IPL 2026 Live Scorecard : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांचा हा 19 व्या मोसमातील सातवा सामना असणार आहे. दोघांपैकी कोणत्या संघाने सर्वाधिक सामने जिंकलेत? जाणून घ्या.

RCB vs GT Live Streaming : गुजरातसमोर आरसीबीचं आव्हान, कोण जिंकणार?
Virat Kohli and Shubman Gill RCB vs GT IPLImage Credit source: TV9 Bharatvarsh
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 24, 2026 | 4:16 AM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 34 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. ‘किंग कोहली’ अर्थात विराट कोहली आणि ‘प्रिन्स’ शुबमन गिल असा हा सामना असणार आहे. रजत पाटीदार आरसीबीचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याच्या खांद्यावर गुजरातच्या कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. गतविजेत्या आरसीबीने या मोसमात आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. मात्र आरसीबीचा गेल्या सामन्यात पराभव झालाय. तसेच गुजरातलाही मुंबई विरुद्ध 99 धावांनी पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे दोन्ही संघांसमोर विजय मिळवून पुन्हा ट्रॅकवर परतण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे चाहत्यांना या सामन्यात रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

दोन्ही संघांचा हा 19 व्या मोसमातील सातवा सामना असणार आहे. गुजरात सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरली आहे. तर गतविजेता आरसीबीने अपवाद वगळता उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे गुजरात आणि बंगळुरुपैकी कोण वरचढ ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने उभयसंघातील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

बंगळुरु विरुद्ध गुजरात सामना कधी?

बंगळुरु विरुद्ध गुजरात सामना शुक्रवारी 24 एप्रिलला होणार आहे.

बंगळुरु विरुद्ध गुजरात सामना कुठे?

बंगळुरु विरुद्ध गुजरात सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु इथे होणार आहे.

बंगळुरु विरुद्ध गुजरात सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

बंगळुरु विरुद्ध गुजरात सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

बंगळुरु विरुद्ध गुजरात सामना टीव्हीवर आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

बंगळुरु विरुद्ध गुजरात सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपद्वारे सामना मोबाईल आणि लॅपटॉपवर पाहायला मिळेल.

दोन्ही संघ तुल्यबल

दरम्यान बंगळुरु आणि गुजरात यांच्यात शुक्रवारी 24 एप्रिलला होणारा एकूण सातवा सामना असणार आहे. आकडेवारी पाहता दोन्ही संघ तुल्यबळ असल्याचं स्पष्ट होतं. आररसीबी विरुद्द गुजरात यांच्यात आतापर्यंत एकूण 6 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी 3 सामने गुजरातने जिंकले आहेत. तर आरसीबीने 3 वेळा विजय मिळवून गुजरातचा हिशोब केला आहे. त्यामुळे गुजरात आणि बंगळुरुपैकी कोणता संघ सामना जिंकून 4-3 अशी आघाडी घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल