अक्षय कुमारने ‘या’ कारणामुळे चाहत्यांसमोर जोडले हात, हाऊसफुल 5 च्या प्रमोशनचा व्हिडिओ व्हायरल

अक्षय कुमारचा हाऊसफुल 5 हा चित्रपट 6 जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयसह जवळपास 30 स्टार कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपचाच्या प्रमोशनदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अक्षय कुमारने या कारणामुळे चाहत्यांसमोर जोडले हात, हाऊसफुल 5 च्या प्रमोशनचा व्हिडिओ व्हायरल
| Updated on: Jun 02, 2025 | 8:11 PM

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार आता एका नव्या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हाऊसफुल 5 असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. या चित्रपटात अक्षयसह जवळपास 30 स्टार कलाकारांचा समावेश असणार आहे. हा चित्रपट 6 जूनला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. अशातच आता अक्षय कुमार या चित्रपचाच्या प्रमोशनदरम्यान चाहत्यांसमोर हात जोडताना दिसत आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अक्षयला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

मिळालेल्या माहितीनुसार अक्षय कुमार आणि इतर कलाकार हाऊसफुल 5 या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यातील एका मॉलमध्ये आले होते. यावेळी मॉलमध्ये महिलांसह अनेक लहान मुलेही होती, त्यावेळी अक्षय कुमार आणि इतर कलाकारांना पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी जमली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. काहीजण धक्काबुक्की करु लागले. त्यामुळे अक्षय कुमारने पुढाकार घेत गर्दी नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

व्हिडिओ आला समोर

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मॉलमधील लोक अक्षयला पाहण्यासाठी एकत्र जमलेले आहेत. मात्र काही काळानंतर लोक एकमेकांना धक्काबुक्की करु लागतात. गर्दी नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसत असताना, अक्षय कुमारने स्टेजवरून चाहत्यांना शांतता राखण्याची आणि धक्काबुक्की न करण्याची विनंती केली.

 

 

अक्षय कुमारने चाहत्यांसमोर जोडले हात

गर्दी पाहून अक्षय कुमारने चाहत्यांना हात जोडून आवाहन केले. अक्षय म्हणाला की ‘मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. इथे महिला आहेत, कृपया धक्का-बुक्की करु नका. इथे महिला आहेत, मुले आहेत, धक्का देऊ नका.’ अक्षयचा ही व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे आणि प्रेक्षक त्यावर कमेंटही करत आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, ‘अक्षय कुमार माझा आवडता अभिनेता आहे.’ दुसऱ्या व्यक्तीने लिहिले, ‘व्वा, हा महिलांचा आदर आहे.’ अक्षय ज्या पद्धतीने गर्दीला समजावून सांगत आहे, यामुळे तो महिलांचा किती आदर करतो हे दिसते.

हाऊसफुल 5 6 जूनला प्रदर्शित होणार

हाऊसफुल 5 चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी फक्त काही दिवस शिल्लक आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चाहते देखील या सुपरहिट चित्रपटाच्या पाचव्या भागाची वाट पाहत आहेत.