Akshay Kumar: सिनेमे फ्लॉप झाले तरी चिंता नाही; अक्षय कुमारची संपत्ती पाहून तुमचेही डोळे विस्फारतील!

चित्रपटांच्या तगड्या मानधनासोबतच तो जाहिरातींमधूनही मोठी रक्कम कमावतो. त्याच्याकडे 11 लक्झरी कार आहेत. यामध्ये मर्सिडीज बेंझ, बेंटले, होंडा कर्व्ह आणि पोर्श यांचा समावेश आहे.

Akshay Kumar: सिनेमे फ्लॉप झाले तरी चिंता नाही; अक्षय कुमारची संपत्ती पाहून तुमचेही डोळे विस्फारतील!
Akshay KumarImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 5:42 PM

बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारसाठी (Akshay Kumar) सध्याचा काळ जरा वाईट चालला आहे. कारण यावर्षी त्याचे तीन चित्रपट आतापर्यंत प्रदर्शित झाले आणि हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत. ‘बच्चन पांडे’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘अतरंगी रे’ हे त्याचे चित्रपट दणक्यात आपडले. असं असलं तरी याचा अक्षयवर फारसा परिणाम होणार नाही. बॉक्स ऑफिसवर एकामागोमाग एक चित्रपट जरी फ्लॉप (Flop Movies) झाले तरी अक्षयच्या संपत्तीचा (Net Worth) आकडा हा दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे.

अक्षय कुमार मुंबईतील एका आलिशान बंगल्यात राहतो. जुहूच्या समुद्रकिनारी त्याचा हा बंगला आहे. घरातील आणि त्याबाहेर असलेल्या बागेतील फोटो अक्षय आणि ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. हे फोटो पाहून त्याचं घर किती आलिशान आहे, याचा अंदाज येतो.

हे सुद्धा वाचा

जवळपास 7.8 कोटी रुपयांना विकत घेतलेला हा ड्युप्लेक्स बंगला अक्षयने खूप चांगल्या प्रकारे सजवला आहे. याशिवाय अंधेरीच्या ट्रान्सकॉन ट्रायम्फ टॉवरमध्येही त्याने चार फ्लॅट खरेदी केले आहेत. गोव्यातील एका व्हिलावरही त्याने आपलं नाव कोरलं आहे. इतकंच नाही तर मॉरिशसमध्ये त्याचा समुद्रकिनारी बंगला आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षयची संपूर्ण संपत्ती ही जवळपास 340 दशलक्ष डॉलर्सच्या घरात आहेत. ही रक्कम भारतीय चलनात रुपांतर केल्यास त्याचा आकडा अब्जांमध्ये पहायला मिळतो. याशिवाय त्याचं स्वतःचं एक प्रॉडक्शन हाऊस आहे, ज्याचं नाव हरी ओम एंटरटेन्मेंट कंपनी आहे. त्याची ग्रेझिंग गोट पिक्चर्स नावाची आणखी एक निर्मिती कंपनी आहे. त्याचा स्वतःचा कबड्डी संघसुद्धा आहे. खालसा वॉरियर्स असं त्याचं नाव आहे.

चित्रपटांच्या तगड्या मानधनासोबतच तो जाहिरातींमधूनही मोठी रक्कम कमावतो. त्याच्याकडे 11 लक्झरी कार आहेत. यामध्ये मर्सिडीज बेंझ, बेंटले, होंडा कर्व्ह आणि पोर्श यांचा समावेश आहे. याशिवाय त्याला बाइक्सचीही खूप आवड आहे. जॉन अब्राहमनेही त्याला अनेकदा बाइक्स गिफ्ट केल्या आहेत. सोशल मीडियावरील एका प्रमोशनल पोस्टसाठीही तो कोट्यवधी रुपये घेतो. आता तुम्ही स्वतः विचार करू शकता की अक्षयकडे पैशांची कमतरता नाही. चित्रपट फ्लॉप ठरला तरी त्याला त्याचं मानधन मिळतंय.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.