
मुंबई : शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी रिलीज झाला. या चित्रपटाने धमाकेदार ओपनिंग करत जबरदस्त कमाई केलीये. पठाण (Pathaan) चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठा वाद निर्माण झाला होता. सतत चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात होती. या वादावर शाहरुख खान (Shah Rukh Khan) यानेही काहीच भाष्य चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर केले नव्हते. चित्रपट रिलीज झाल्यावर शाहरुख खान म्हणाला होता की, कोणत्याही धर्माच्या भावना दुखवण्याचा आमचा उद्देश अजिबात नाही. तसेच मी सर्व धर्मातील लोकांसाठी चित्रपट (Movie) तयार करतो. चित्रपट व्यवस्थितपणे कोणत्याही वादाशिवाय रिलीज व्हावा हिच माझी भावना सुरूवातीपासून होती. पठाण चित्रपटाने धमाका केल्यानंतर आता शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाची चर्चा रंगताना दिसत आहे. जवान हा चित्रपट शाहरुख खान याचा आगामी बहुचर्चित चित्रपट आहे.
शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. हा फोटो पाहून चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. कारण हा फोटो शाहरुख खान याच्यासह अल्लू अर्जुन याच्याही चाहत्यांसाठी स्पेशल आहे.
जवान या चित्रपटाचे दिग्दर्शन एटली कुमार हे करत आहेत. या चित्रपटामध्ये शाहरुख खान याच्यासह विजय सेतुपती आणि नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यामुळे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठे क्रेझ बघायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खान एका वेगळ्या भूमिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
काही दिवसांपूर्वी एक चर्चा सुरू होती की, जवान या चित्रपटामध्ये विजय थलपती याचा देखील कॅमिओ असणार आहे. मात्र, याबद्दल अजून तरी काही अपडेट मिळाले नाहीये. शाहरुख खान आणि अल्लू अर्जुन यांचा जवान चित्रपटाच्या सेटवरील फोटो व्हायरल झाल्याने अनेक चर्चा सुरू आहेत.
अशी एक चर्चा सतत रंगताना दिसत आहे की, जवान या चित्रपटाच्या माध्यमातून अल्लू अर्जुन हा बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. म्हणजेच जर हे खरे ठरले तर अल्लू अर्जुन आणि शाहरुख खान स्क्रीन शेअर करताना दिसतील. असे सांगितले जात आहे की, जवान या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन याचा स्पेशल कॅमिओ असणार आहे.