कधी काळी गोऱ्या साहेबांचा देश होता,आता मिनी पाकिस्तान म्हटला जातोय ? काय कारण ?
भारतात आणि जगातही मुसलमानांची संख्या वाढल्याची भीती अनेकदा व्यक्त केली जात असते. त्यात काही वेळा अतिरंजितपणाही असतो. परंतू गोऱ्या साहेबांच्या देशात मात्र मुस्लीमांची संख्या नजरेत भरेल इतकी वाढली आहे.

भारतात मुस्लीमांची लोकसंख्या वाढल्याचा दावा केला जातो.भारत, बांगलादेश किंवा अन्य देशात घुसखोरांचा प्रश्न मोठा आहे. आता अनेक देशात मुसलमानाची संख्या वाढत आहे. आता एक गोऱ्या साहेबांचा देश काही वर्षांनी मिनी पाकिस्तान होईल का काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.कारण या देशाची मूळ स्थानिक लोकांची संख्या अत्यंत कमी आहे. आणि तेथे मुस्लीमांची संख्या वाढत चालली आहे.
मुस्लीमांची वाढती लोकसंख्या ही काही भारताची समस्या राहिलेली नाही. तर ती जागतिक समस्या बनलेली आहे. युके म्हणजे ग्रेट ब्रिटनमध्ये आता मुसलमानांची संख्या वाढत चालली आहे. ज्या देशात आधी गोरे साहेब आणि गोऱ्या मॅडम फिरायच्या तेथे आता हिजाब आणि बुरखेधारी महिला दिसू लागल्या आहेत. मग तुम्ही मॉलमध्ये जा, किंवा सार्वजनिक स्थळी जा, यांच्या वाढत्या संख्येचा अंदाज तुम्हाला येईल. लंडन फिरण्यासाठी गेलेल्या एका टुरिस्टने तेथील रस्त्यावरील परिस्थितीचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात आपण लंडन आहोत की पाकिस्तानमध्ये असा प्रश्न पडतो.
कशी आहे परिस्थिती
युकेच्या २०२१ च्या लोकसंख्येनुसार ब्रिटनची एकूण लोकसंख्या ६७ दशलक्ष ( ६.७ कोटी रु. ) आहे.ज्यात मुसलमान ४ दशलक्ष ( ४ कोटी ) ( ६.५ टक्के ) आहेत. ही २०११ मध्ये मुसलमानांची संख्या २.७ मिलियन ( ४.९ टक्के ) होती, आता त्यात ४४ टक्के वाढ झाली आहे.
लंडनमध्ये मुसलमानांची संख्या १५ टक्के आहे,जी सर्वात जास्त आहे. मुस्लीम काऊन्सिल ऑफ ब्रिटनच्या २०२५ च्या अहवालात म्हटले होते की २०११-२०२१ मुस्लीम लोकसंख्या १.२ दशलक्ष वाढली. जी युकेच्या एकूण वाढीच्या ३२ टक्के आहे. प्रोजेक्शननुसार २१०० पर्यंत मुसलमान २० टक्के होऊ शकतात. परंतू बहुसंख्यांक (५० टक्के + ) होण्यास आणखी अनेक वर्षे लागतील. अखेर लंडनमध्ये मुसलमानांची संख्या वाढण्याचे कारण काय आहे असा सवाल केला जात आहे. याचे मुख्य कारण उच्च जन्मदर ( मुस्लीम महिला सरासरी २.९ मुले विरुद्ध एकूण १.८ ), इमिग्रेशन (पाकिस्तान, बांगलादेश, सोमालियाहून ) आणि कन्व्हर्जन. परंतू अनधिकृत इमिग्रेशन युकेत कमी आहे. बहुतांशी लोक अधिकृत स्थलांतरीत आहेत.
भारताशी तुलना
भारतात मुसलमान १४ टक्के ( १७२ दशलक्ष – १७ कोटी ) आहेत. जे १९५१ च्या लोकसंख्ये पेक्षा ९.८ टक्के वाढले आहे. परंतू ग्रोथ रेट घसरली आहे. ( १९९१-२००१:२९ टक्के,२०११ :२४ टक्के ) यात अधिकृत इमिग्रेशन ( बांगलादेशातून ) एक मुद्दा आहे. परंतू सरकारी आकडे अतिरंजित दाव्यांना फेटाळत आहे. CAA-NRC सारखे कायदे यासाठी तयार करण्यात आले आहेत. पीयू रिसर्च आणि युके सरकारचा अहवाल म्हणतो की मुस्लीमांची ग्रोथ नॅचरल आहे. परंतू इंटीग्रेशन आव्हान आहे. युकेत मुसलमान अर्थव्यवस्थेत योगदान देत आले आहेत.परंतू काही भागात सेग्रीगेशन आहे. लंडन अजून मिनी पाकिस्तान बनलेला नाही. मात्र, बहुसांस्कृतिक शहर बनला आहे.
