Jhund Teaser : एक झलक सबसे अलग, अमिताभ बच्चन यांची ‘झुंड’ स्टाईल, नागराज मंजुळेंकडून नवा टीझर शेअर

नागराज मंजुळे यांनी एक टीझर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या टीझरला चांगलीच पसंती मिळताना दिसतेय.

Jhund Teaser : एक झलक सबसे अलग, अमिताभ बच्चन यांची झुंड स्टाईल, नागराज मंजुळेंकडून नवा टीझर शेअर
अमिताभ बच्चन, नागराज मंजुळे-झुंड
| Edited By: | Updated on: Feb 08, 2022 | 1:02 PM

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांची मुख्य भूमिका असलेला ‘झुंड(Jhund) हा चित्रपट येत्या 8 मार्चला रिलीज (Jhund release 4 march) होणार आहे. या चित्रपटाबाबत सगळ्यांमध्येच उत्सुकता आहे. मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. नागराज मंजुळे यांनी एक टीझर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या टीझरला चांगलीच पसंती मिळताना दिसतेय. या टीझरमध्ये अमिताभ बच्चन यांनी एन्ट्री आणि त्यांची ‘झुंड’ स्टाईल पहायला मिळतेय. सोबतच बॅगराऊंडला चित्रपटातील गाण्याचं म्युझिकही ऐकायला मिळतंय.

झुंडचा टीझर

अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या झुंड सिनेमाबाबत सिनेरसिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. सोशल मीडियावर या सिनेमाबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी एक टीझर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या टीझरमध्ये अमिताभ बच्चन यांनी एन्ट्री आणि त्यांची ‘झुंड’ स्टाईल पहायला मिळतेय. सोबतच बॅगराऊंडला चित्रपटातील गाण्याचं म्युझिकही ऐकायला मिळतंय. या टीझरला चांगलीच पसंती मिळताना दिसतेय.

सिनेमा गोष्ट

हा सिनेमा झोपडपट्टीत राहणारी मुलं आणि त्यांचे क्रीडा प्रशिक्षक यांच्यावर बेतलेला आहे. अमिताभ बच्चन हे क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. झोपडीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या सिनेमाची कथा आहे. सत्यकथेवर आधारित हा सिनेमा आहे. नागराज मंजुळे यांना या सिनेमाची कथा लिहिण्यासाठी दोन वर्षांचा वेळ लागला. या चित्रपटाची कथा लिहिताना अमिताभ बच्चन यांना डोळ्यासमोर ठेवून या सिनेमातील प्रशिक्षकाचं पात्र नागराज मंजुळे यांनी लिहिलं आणि आता स्वत: अमिताभ बच्चन यांनी साकारलेलं विजय बारसे हे पात्र घेऊन सिनेमा 4 मार्चला प्रदर्शित होतोय. हा सिनेमा विजय बारसे आणि त्यांचे शिष्य यांच्यावर आधारित आहे.

4 मार्चला प्रदर्शित होणार

बिग बी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला झुंड हा चित्रपट येत्या 8 मार्चला रिलीज होतोय. या सिनेमाबद्दल सिनेरसिकांमध्ये उत्सुकता आहे त्यामुळे प्रदर्शनानंतर या सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतो पहावं लागेल.

संबंधित बातम्या

मीरा जगन्नाथ आणि जय दुधाणे यांचं ‘जोडी दोघांची दिसते चिकनी’ गाणं रिलीज, बिग बॉसनंतर पहिल्यांदाच दोघे एकत्र

Sai Tamhankar Photos : सई ताम्हणकरचा क्लासी लूक, फोटो इन्स्टाग्रामवर फोटो शेअर

Praveen Kumar Sobti Passed Away : महाभारतात भिमाची भूमिका साकारणारे अभिनेते, अ‍ॅथलिट प्रविण कुमार सोबती यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास