AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | विराटला सोडून मुंबईमध्ये ‘या’ व्यक्तीसोबत गाडीवर फिरणे अनुष्का शर्मा हिला पडणार महागात? कारवाई करण्याची होत आहे मागणी

बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. आयपीएल मॅच बघण्यासाठी अनुष्का शर्मा ही नेहमीच उपस्थित असते. अनुष्का शर्मा ही गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. अनुष्का शर्मा हिचा एक व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

Video | विराटला सोडून मुंबईमध्ये 'या' व्यक्तीसोबत गाडीवर फिरणे अनुष्का शर्मा हिला पडणार महागात? कारवाई करण्याची होत आहे मागणी
| Updated on: May 15, 2023 | 9:17 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अनुष्का शर्मा ही बऱ्याच वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, असे असतानाही अनुष्का शर्मा ही चर्चेत राहणारे नाव आहे. आयपीएल मॅच दरम्यान विराट कोहली याच्या टिमला सपोर्ट करण्यासाठी नेहमीच अनुष्का शर्मा ही स्टेडियममध्ये उपस्थित असते. अनुष्का शर्मा ही सोशल मीडियावरही (Social media) सक्रिय असून चाहत्यांसाठी कायमच फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी त्यांच्या मुलीचे नाव वामिका असे ठेवले आहे. मात्र, अजूनही विराट कोहली किंवा अनुष्का शर्मा यांनी त्यांच्या मुलीची झलक ही चाहत्यांना दाखवली नाहीये.

नुकताच मदर्स डे झालाय. मदर्स डेची खास पोस्ट अनुष्का शर्मा हिने सोशल मीडियावर शेअर केली. सध्या अनुष्का शर्मा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा दिसत असून चक्क बॉडीगार्डसोबत मुंबईमध्ये गाडीवर फिरताना दिसत आहे. अनुष्का शर्मा हिचा हा फोटो पाहून चाहत्यांना धक्का बसलाय.

अनुष्का शर्मा ही बॉडीगार्डसोबत गाडीवर का फिरत आहे, हा प्रश्न अनेकांना पडला असेल ना? त्याचे कारणही तेवढेच मोठे आहे. रस्त्यावर झाड पडले असल्याने पूर्ण रस्ता जाम झाला आणि मग थेट अनुष्का शर्मा ही बॉडीगार्डसोबत गाडीवर निघाली. आता अनुष्का शर्मा हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

अनुष्का शर्मा हिच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले की, मॅडम इतके काय जास्त महत्वाचे काम आहे जे तुम्ही बॉडीगार्ड सोबत गाडीवर निघालात. दुसऱ्याने लिहिले की, अनुष्का शर्मा हिला मुंबईच्या रस्त्यावर गाडीवर फिरायला प्रचंड आवडते, काही दिवसांपूर्वी ही विराट कोहली याच्यासोबत देखील गाडीवर फिरत होती.

तिसऱ्याने कमेंट करत लिहिले की, मॅडम आणि त्यांच्या बॉडीगार्ड देखील हेल्मेट घातले नाहीये. विशेष म्हणजे बॉडीगार्डचा आणि अनुष्का शर्मा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, तरीही मुंबई पोलिस हे अनुष्का शर्मावर कारवाई का करत नाहीयेत? व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तर किमान अनुष्का शर्मा हिच्यावर कारवाई करायला हवी. हेल्मेट न घालता हे दोघे गाडीवर फिरत आहेत, इतर लोक यांच्याकडून काय शिकणार ना?

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?