एकता कपूरविरोधात अटक वॉरंट जारी, वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण…

गेल्या वर्षी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंभूकुमार यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. यानंतर एकता कपूर आणि शोभा कपूर यांना न्यायालयाने समन्स पाठवले होते.

एकता कपूरविरोधात अटक वॉरंट जारी, वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण...
Ekta kapoor
| Updated on: Sep 28, 2022 | 8:39 AM

मुंबई : टीव्ही मालिकांची क्वीन अर्थात एकता कपूरच्या (Ekta Kapoor) अडचणींमध्ये मोठी वाढ झालीये. बिहारच्या बेगुसराय न्यायालयाने एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. यामुळे कोणत्याही क्षणी एकता कपूरला अटक (Arrested) होऊ शकते. वेब सीरिज XXX सीजन 2 मध्ये दाखवण्यात आलेल्या काही सीन्समुळे एकताच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झालीये. XXX सीजन 2 ही एकता कपूरची वेब सीरिज (Web series) सुरूवातीपासूनच वादांच्या भोवऱ्यात सापडलीये.

गेल्या वर्षी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंभूकुमार यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. यानंतर एकता कपूर आणि शोभा कपूर यांना न्यायालयाने समन्स पाठवले होते. या वेब सीरिजमध्ये काही सीन्स दाखवण्यात आले आहेत, यावर आक्षेप नोंदवण्यात आलाय.

XXX सीजन 2 मध्ये सैनिकांच्या पत्नींविषयी अत्यंत चुकीचे सीन्स दाखण्यात आले आहेत. यामुळे देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांच्या पत्नींची प्रतिमा मलिन होत असल्याचे म्हटले जात आहे.

एकता कपूरच्या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या सीन्सविरोधात माजी सैनिक संघटना थेट दाद मागण्यासाठी न्यायालयात गेलीये. आता याच प्रकरणी न्यायालयाने एकता कपूरविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.

एकता कपूरची वेब सीरिज XXX सीजन 2 सुरूवातीपासूनच वादात सापडली होती. या वेब सीरिजचा पहिला भाग प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. मात्र, दुसरा भाग चांगलाच वादात सापडलाय.

एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाल्यानंतर आता यावर एकता कपूर नेमके काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टीव्ही मालिकांची क्वीन म्हणून एकता कपूरची ओळख आहे.