AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोजपुरी अभिनेत्रीचा बागेश्वर धामच्या बाबांसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

Akshara Singh Meets Baba Bageshwar: अक्षरा सिंह पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतीच अक्षराने बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतली. सध्या अक्षराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

भोजपुरी अभिनेत्रीचा बागेश्वर धामच्या बाबांसोबतचा व्हिडीओ  सोशल मीडियावर तुफान व्हायरल!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: May 17, 2023 | 11:53 PM
Share

मुंबई : भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. आताही अक्षरा सिंह पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतीच अक्षराने बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतली. यावेळी अक्षराने धीरेंद्र शास्त्री यांना भजन देखील म्हणून दाखवले आहे. सध्या अक्षराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

अक्षराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्यासोबतच्या भेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिनं हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, ज्यांना ऐकायला संपूर्ण जग आतुर आहे, त्यांनीच आज मला ऐकलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. यासोबतच अक्षराने जय सीता रामचा हॅशटॅग लावला आहे तसंच बागेश्वर बाबा की जय असंही तिनं लिहिलं आहे.

बाबा बागेश्वर कुठे आहेत?

गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री बिहार मधील पटना येथे आहेत. तिथे त्यांचा दिव्य दरबार सुरू आहे. पण पहिल्याच दिवशी त्यांच्या दरबारात लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे तो दरबार रद्द करण्यात आला होता. तसंच तेथे सुरू असलेल्या हनुमान कथेचा आज चौथा दिवस आहे.

अक्षरा सिंह ही भोजपुरी सिने सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अक्षराने 2010 मध्ये तिच्या फिल्मी करिअरला सत्यमेव जयते या चित्रपटातून सुरुवात केली होती. त्यानंतर तिने साजन चले ससुलाल, एक बिहारी सौ पे भारी, दिलेर, प्रतिज्ञा 2, ए बलमा बिहार वाला, खून की होली एक प्रतिघात, साथिया यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. तसंच अक्षराचे चाहते लाखोंच्या संख्येत आहेत. सध्या तिचे इंस्टाग्रामवर 56 लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!