“शाळेबाहेर तुम्हाला जे घालायचंय ते घाला पण शाळेत…”, कर्नाटक हिजाब प्रकरणी भाजप खासदार हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया

| Updated on: Feb 10, 2022 | 12:59 PM

भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी कर्नाटक हिजाब प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शाळेत हिजाब घालून येण्याला विरोध केला आहे.

शाळेबाहेर तुम्हाला जे घालायचंय ते घाला पण शाळेत..., कर्नाटक हिजाब प्रकरणी भाजप खासदार हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया
हेमा मालिनी
Follow us on

मुंबई : कर्नाटक हिजाब प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी तीन दिवस राज्यातील सर्वा शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. या पार्श्वभूमीवर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अश्यात आता भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शाळेत हिजाब घालून येण्याला विरोध केला आहे. त्या म्हणाल्या की, “शाळा आणि महाविद्यालयं ही शिक्षणासाठी असतात. त्यामुळे धर्मिक गोष्टी शाळेत घेऊन जाणं योग्य नाही. प्रत्येक शाळेचा एक गणवेश असतो आणि त्याचा सन्मान सर्वांनी करायला हवा. शाळेच्या बाहेर तुम्हाला जे काही घालायचं आहे ते घालण्याचा तुम्हाला स्वातंत्र्य आहे. पण शाळेत तुम्ही गणवेशच घालायला हवा”, असं हेमा मालिनी म्हणाल्या आहेत. त्या एएनआयशी बोलत होत्या.

हेमा मालिनी यांचं हिजाब प्रकरणी प्रतिक्रिया

हेमा मालिनी यांनी कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब प्रकरणावर प्रतिक्रिया आहे. “शाळा आणि महाविद्यालयं ही शिक्षणासाठी असतात. त्यामुळे धर्मिक गोष्टी शाळेत घेऊन जाणं योग्य नाही. प्रत्येक शाळेचा एक गणवेश असतो आणि त्याचा सन्मान सर्वांनी करायला हवा. शाळेच्या बाहेर तुम्हाला जे काही घालायचं आहे ते घालण्याचा तुम्हाला स्वातंत्र्य आहे. पण शाळेत तुम्ही गणवेशच घालायला हवा”, असं हेमा मालिनी म्हणाल्यात.

हिजाबच्या मुद्द्यावरून कर्नाटकमध्ये तणावाचं वातावरण पहायला मिळतंय. या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी तीन दिवस राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. “आम्ही सध्या कर्नाटक हायकोर्टाच्या आदेशाची वाट पाहात आहोत, मी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की, त्यांनी विनाकारण वाद घालू नये, शांतत ठेवावी”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलं आहे. “विद्यार्थ्यांमध्ये वाद होणार नाहीत याची काळजी घेण्यात यावी”, असे आदेश देखील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून महाविद्यालय प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच जे कोणी चिथावणीखोर वक्तव्य करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आला आहे.

प्रकरण नेमकं काय आहे?

कर्नाटकच्या उडपीमधून हा वाद सुरू झाला आहे. उडपीमधील एका शाळेत मुलींनी हिजाब घातला म्हणून त्यांना शाळेत प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप काही विद्यार्थीनींनी केला होता. या पार्श्वभूमीवर संबंधित विद्यार्थीनींनी हायकोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणावरू कर्नाटकमध्ये तणावाचं वातावरण आहे. हिजाबच्या वादावरून राजकारण देखील तापले असून, आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. विशेष: राज्याच्या शिवमोगा, बागलकोट आणि उडपीमध्ये तणावपूर्ण वातावरण असून, उडपीमध्ये विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने तीन दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या 

Jasmin Sandlas Birthday : पंजाबच्या ‘गुलाबी’ गायिकेचा वाढदिवस, जाणून घ्या कोण आहे की ‘गुलाबी’ गायिका

पुष्पाच्या श्रीवल्ली गाण्यावरती रानू मंडलचा डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

farhan shibani: फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर मॉरिशिअसमध्ये लग्न करणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण