आज बाबू भाई का बर्थडे है! परेश रावल यांचे खळखळून हसवणारे हे हिट 5 चित्रपट पाहिले का? जाणून घ्या!
Paresh Rawal Birthday : आज (30 मे) परेश रावल यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे आज त्यांच्यावर त्यांचे चाहते आणि बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.

मुंबई : बॉलिवूड अभिनेते परेश रावल हे प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी पैकी एक आहेत. परेश रावल असे अभिनेते आहेत ज्यांच्याकडे टॅलेंटचा खजिना आहे. त्यांनी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम करत आणि कॉमेडी अभिनय करत प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. आज (30 मे) परेश रावल यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे आज त्यांच्यावर त्यांचे चाहते आणि बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. तर आज आपण परेश रावल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पाच बेस्ट कॉमेडी चित्रपटांबाबत जाणून घेणार आहोत
1. हलचल परेश रावल यांचा हलचल हा चित्रपट चांगला सुपरहिट ठरला होता. 2004 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात परेश रावल यांनी उत्कृष्ट पद्धतीने कॉमेडी केली आहे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. तसंच प्रेक्षकांना या चित्रपटातील परेश रावल यांची भूमिका चांगलीच आवडली होती. अजूनही प्रेक्षक हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहतात.
2. बडे मियां छोटे मियां परेश रावल यांनी अनेक चित्रपटांमध्ये कॉमेडी भूमिका साकारलेल्या आहेत. पण त्यांनी बडे मियां छोटे मियां या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती. चित्रपटात त्यांनी जोरावर भाई ही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या चित्रपटातून परेश रावल यांनी दाखवून दिले की ते फक्त कॉमेडीच भूमिका नाही तर ते कोणतीही भूमिका साकारू शकतात
3. मोहरा मोहरा चित्रपटात परेश रावल यांची अनोखी भूमिका पाहायला मिळाली होती. या चित्रपटात त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. पोलीस सब इन्स्पेक्टर काशिनाथ साहू ही भूमिका त्यांनी साकारली होती. त्यांचा हा चित्रपट देखील प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता.
4. हेरा फेरी हेरा फेरी हा चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला होता. आजही हा चित्रपट प्रेक्षक अगदी आवडीनं पाहतात. या चित्रपटात परेश रावल यांनी साकारलेली भूमिका चांगलीच गाजली होती. तसंच आता मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटात परेश रावल पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसू शकतात.
5. राजा राजा या चित्रपटात परेश रावल यांनी अतरंगी भूमिका साकारली आहे, ज्यात त्यांचं डोकं खराब झालेलं असतं. त्यांनी त्यांच्या जबरदस्त कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. आजही प्रेक्षक राजा चित्रपट आवर्जून पाहतात.
