‘दबंग’ सलमान खानच्या बांद्रास्थित घरात राहायचंय? ‘इतकं’ घर भाडं मोजायची तयारी आहे का?

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) हा इंडस्ट्रीतील बड्या कलाकारांपैकी एक आहे. तो आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकतो. त्याचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरतो. सलमान खान मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. रिपोर्ट्सनुसार, सलमान खानने मुंबईतील त्याचे दुसरे घर नुकतेच भाड्याने दिले आहे.

‘दबंग’ सलमान खानच्या बांद्रास्थित घरात राहायचंय? ‘इतकं’ घर भाडं मोजायची तयारी आहे का?
Salman Khan
| Edited By: | Updated on: Dec 17, 2021 | 11:55 AM

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) हा इंडस्ट्रीतील बड्या कलाकारांपैकी एक आहे. तो आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकतो. त्याचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरतो. सलमान खान मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. रिपोर्ट्सनुसार, सलमान खानने मुंबईतील त्याचे दुसरे घर नुकतेच भाड्याने दिले आहे.

वृत्तांवर विश्वास ठेवला तर, सलमानचे हे अपार्टमेंट शिवस्थान हाईट्स, ब्रांदा वेस्टमध्ये स्थित आहे. हे घर चौदाव्या मजल्यावर 759 स्क्वेअर फूटमध्ये बांधले गेले आहे. हे अपार्टमेंट भाड्याने दिल्याने सलमान सध्या चर्चेचा भाग बनला आहे.

घरभाडं माहितेय का?

मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, सलमान खानने हा अपार्टमेंट 95,000 रुपयांना भाड्याने दिला आहे. या फ्लॅटसाठी भाडेकरूने 2.85 लाख रुपये जमा केले आहेत. ही सदनिका 33 महिन्यांसाठी देण्यात आली आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, याशिवाय सलमानकडे अनेक मालमत्ता आहेत, ज्या त्याने भाड्याने दिल्या आहेत. सलमानने नुकतेच वांद्रे येथे स्वत:साठी डुप्लेक्स अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे. ज्याचे भाडे 8.25 लाख रुपये प्रति महिना आहे.

सध्या सलमान खान मुंबईत वन बीएचके अपार्टमेंटमध्ये राहतो. याशिवाय त्यांचे पनवेलमध्ये एक आलिशान फार्महाऊस आहे. जिथे सलमान काही महिन्यांत आरामासाठी जात असतो. गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान, सलमान त्याच्या कुटुंबासह त्याच्या फार्म हाऊसवर राहत होता.

‘अंतिम’ची बॉक्स ऑफिसवर धमाल!

सलमान खान सध्या ‘बिग बॉस 15’ हा रिअॅलिटी शो होस्ट करताना दिसत आहे. त्याचा ‘अंतिम’ हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सलमान पोलिसाच्या भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटाला खूप पसंती दिली जात असून, या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनही चांगले झाले आहे. या चित्रपटात सलमानसोबत आयुष शर्मा आणि महिमा मकवाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. याशिवाय तो कतरिना कैफसोबत ‘टायगर 3’मध्ये दिसणार आहे. चित्रपटाचे काही शूटिंग परदेशात झाले आहे.

सलमान खान नुकताच ‘द-बंग’ टूरसाठी रियाधला गेला होता. जिथे त्याने परफॉर्म केले. या दौऱ्यात शिल्पा शेट्टी, प्रभुदेवा, आयुष शर्मा यांच्यासह अनेक कलाकार सलमानसोबत गेले होते. त्याच्या या इव्हेंटचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा :

Miss World 2021 | ‘मिस वर्ल्ड 2021’च्या महाअंतिम सोहळ्यावर कोरोनाचं सावट, मानसा वाराणसीला कोरोनाची लागण!

83 First Movie Review : टीम इंडियाच्या ऐतिहासिक कामगिरीचे सुवर्णक्षण पडद्यावर, 83 इज मास्टरपीस! अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत दमदार कामगिरी

RRR : ज्यांच्या जीवनावर RRR चित्रपट बनला, ते ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि ‘कोमाराम भीम कोण होते? जाणून घ्या