
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकतंच सरोगसीद्वारे बाळाला जन्म दिला. याबाबत तिने काही दिवसांआधी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. प्रियांका आई झाल्यानंतर ती सोशल मीडियापासून दूर होती. आज मात्र तिने तिचे काही फोटो शेअर केले आहे.

प्रियांका चोप्राने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो तिने तिच्या कारमध्ये काढलेला दिसतोय. तिच्या या फोटोला एक मिलियनहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

या फोटोला तिने 'The light feels right' असं कॅपशन दिलं आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांकडून पसंती मिळते आहे.

प्रियंका चोप्राने 2018 साली गायक निक जोनाससोबत लग्न केलं होतं. त्यानंतर आता हे दोघे सरोगेट पालक झाले आहेत.

देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या चित्रपटांमधल्या कॉन्फिडन्ट भूमिका अनेकांना आवडतात. बाजीराव मस्तानी, दिल धडकने दो, मेरी कोम या चित्रपटातील तिचं काम अनेकांच्या पसंतीस उतरलं.