Manju Singh Passed Away : अभिनेत्री मंजू सिंह यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

| Updated on: Apr 16, 2022 | 3:50 PM

प्रसिद्ध बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री मंजू सिंह यांचं निधन झालंय. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वेसा घेतला. त्या मागच्या काही दिवसांपासून आजारी होत्या.

Manju Singh Passed Away : अभिनेत्री मंजू सिंह यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मंजू सिंग यांचं निधन
Follow us on

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री मंजू सिंह (Manju Singh) यांचं निधन झालंय. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वेसा घेतला. त्या मागच्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्या निधनाबाबत (Manju Singh Passed Away) त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने माहिती देण्यात आली. गुरुवारी त्यांचं मुंबईत निधन झाल्याचं त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने आज (शनिवार) सांगण्यात आलं. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांच्या जाण्यावर दु:ख व्यक्त केलं. गीतकार आणि अभिनेते स्वानंद किरकिरे (Swanand Kirkire) यांनी ट्विट करत त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं.

मंजू सिंह यांचं निधन

अभिनेत्री मंजू सिंह यांचं निधन झालंय. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वेसा घेतला. त्या मागच्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्या निधनाबाबत त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने माहिती देण्यात आली. गुरुवारी त्यांचं मुंबईत निधन झाल्याचं त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने आज (शनिवार) सांगण्यात आलं.

स्वानंद यांचं ट्विट

गीतकार आणि अभिनेते स्वानंद किरकिरे यांनी ट्विट करत त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. “मंजू सिंहजी, आता आपल्यात नाहीत. दूरदर्शनसाठी स्वराज या कार्यक्रमाचं लेखन करण्यासाठी त्यांनी दिल्लीहून मला बोलावलं होतं. त्यांनी दूरदर्शनवरील मालिकांमध्ये काम केलं. हृषीकेश मुखर्जींच्या गोलमालमध्ये त्यांनी रत्ना हे पात्र साकारलं. तुमचं काम आणि तुम्ही तुमचे प्रेम मी विसरू शकत नाही. अलविदा!”, असं स्वानंद म्हणाले आहेत.

मंजू सिंह यांचं करिअर

मंजू सिंह यांनी 1980 च्या दशकात छोट्या पडद्यावर पहिला कार्यक्रम केला. यात त्यांनी ‘शो थीम’ने सुरुवात केली. त्यांनी नंतर दूरदर्शनसाठी मालिका, लहान मुलांचे कार्यक्रम, आध्यात्मिक केले. त्यांनी अनेक संस्मरणीय दूरदर्शन कार्यक्रमांची निर्मितीही केली. त्यात ‘एक कहानी’, ‘स्वराज’, ‘अधिकार’ यांचा समावेश आहे. लहान मुलांसाठीच्या ‘खेल खिलाडी’ कार्यक्रमाचं त्यांनी अँकरिंगही केलं. जो त्यावेळच्या सर्वात जास्त काळ चाललेल्या शोपैकी एक होता. मंजू सिंह यांनी 1979 मध्ये आलेल्या गोलमाल चित्रपटात अभिनेता अमोल पालेकरच्या धाकट्या बहिणीची ‘रत्ना’ची भूमिका साकारली होती. याशिवाय त्यांनी काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केल आहे.

संबंधित बातम्या

Aliya Bhatta- Kapoor : खास पोस्ट लिहित आलियाने शेअर केले मेहंदीच्या सोहळ्याचे फोटो

Wedding : आलियाच्या लग्नानंतर भावूक झालेल्या महेश भट्ट यांनी जावई रणबीरला मारली मिठी, पाहा खास फोटो!

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अभिनेता ‘थलपथी विजय’ यांच्याबद्दलच्या ‘या’ खास गोष्टी