अहमदाबाद विमान अपघातामुळे बॉलिवूड हादरलं, अक्षय कुमारपासून सनी देओलपर्यंत, या सेलिब्रिटींनी व्यक्त केलं दुःख

अहमदाबादमधील विमान अपघाताने सर्वांनाच हादरवून टाकले आहे. लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळले. विमानात 242 लोक होते. या घटनेनं बॉलिवूड स्टार्सनाही धक्का बसला असून अनेकांनी यावर शोक व्यक्त केला आहे.

अहमदाबाद विमान अपघातामुळे बॉलिवूड हादरलं, अक्षय कुमारपासून सनी देओलपर्यंत, या सेलिब्रिटींनी व्यक्त केलं दुःख
Bollywood Celebs React to Ahmedabad plane Crash
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 12, 2025 | 5:21 PM

गुरुवारी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या बातमीने सर्वांनाच हादरवून टाकलं. विमानात 242 लोक होते. या बातमीमुळे बॉलिवूड स्टार्सही हादरले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. अक्षय कुमार, सोनू सूद, सनी देओल, दिशा पटानी आणि इतर अनेक स्टार्सनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सनी देओलने प्रतिक्रिया देत एक्स वर लिहिले, “अहमदाबादमधील विमान अपघाताने धक्का बसला आहे. वाचलेल्यांना आवश्यक असलेली सर्व मदत मिळावी यासाठी प्रार्थना करतो. ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि त्यांच्या कुटुंबियांना अशा दुःखद काळात शक्ती मिळो.”

सोनू सूदची प्रतिक्रिया

सोनू सूदने लिहिले, “अहमदाबादमध्ये अपघात झालेल्या एअर इंडियाच्या विमानातून लंडनला जात होते त्यांच्यासाठी प्रार्थना.”

दिशा पटानीने प्रतिक्रिया व्यक्त केली आणि म्हणाली, “अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताबद्दल ऐकून खूप दुःख झाले. वाचलेल्यांना मदत मिळेल अशी आशा आहे. प्रभावित झालेल्यांसाठी प्रार्थना. ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुर्घटनेचा सामना करण्याची हिंमत मिळो.”


अक्षय कुमारने काय लिहिले?

अक्षय कुमारने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. त्याने लिहिले आहे की, “एअर इंडियाच्या विमान अपघाताबद्दल ऐकून धक्का बसला आणि अवाक झालो. अशा वेळी फक्त प्रार्थना.”

 

तर जान्हवीने इन्स्टा स्टोरी देखील पोस्ट केली आहे. तिने म्हटले आहे की, “एअर इंडियाच्या विमान अपघाताबद्दल ऐकून धक्का बसला. अशा दुर्दैवी घटनेला शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे. प्रवासी, क्रू आणि त्यांच्या प्रियजनांची वाट पाहणाऱ्या सर्व कुटुंबांसाठी प्रार्थना.”

रितेश देशमुखने देखील पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे , “हे हृदयद्रावक आहे. अहमदाबाद विमान अपघाताबद्दल ऐकून मला धक्का बसला आहे. या कठीण काळात, मी सर्व प्रवाशांना, त्यांच्या कुटुंबियांना आणि प्रभावित झालेल्या सर्वांना माझ्या प्रार्थनेत ठेवतो.”

या सर्वांव्यतिरिक्त, इतर अनेक चित्रपट कलाकारांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे आणि दुःख व्यक्त केले आहे.