AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेहा कक्करचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, नेहाची ‘नाराजगी’ तीन तासात 25 लाखांपार

बॉलिवूड गायिका नेहा कक्करची गाणी सोशल मीडियावर ट्रेंडिग असतात. नेहाचं एक नवं गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. नेहाचं नाराजकी हे नवं गाणं यूट्यूबवर प्रदर्शित झालं आहे.

नेहा कक्करचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, नेहाची 'नाराजगी' तीन तासात 25 लाखांपार
नेहा कक्कर
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Mar 01, 2022 | 1:53 PM
Share

आयेशा सय्यद, मुंबई : बॉलिवूड गायिका नेहा कक्करची (Bollywood Singer Neha Kakkar) गाणी सोशल मीडियावर ट्रेंडिग असतात. नेहाचं एक नवं गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. नेहाचं नाराजकी (Narazgi Song Release) हे नवं गाणं यूट्यूबवर प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचा सध्या सोशल मीडियावर बोलबाला आहे. या गाण्याला अवघ्या दोन तासात 25 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर 2 लाखांहून अधिकांनी लाईक करून या गाण्याला पसंती दिली आहे. तर एक हजाराहून अधिकांनी कमेंट करून गाण्याविषयी आपली मतं मांडली आहेत. नेहा कक्करने स्वत: या गाण्याच्या कमेंट बॉक्समंध्ये एक कमेंट केली आहे. “मला नेहमीचं अश्या प्रकारचं गाणं गायचं होतं आणि तसं गाणं मी गायलं आहे. मला आशा आहे की तुम्हालाही हे गाणं आवडलं असेल”, अशी कमेंट नेहाने केली आहे.

नेहा कक्करचं नवं गाणं

गायिकी नेहा कक्करचं नवं गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. “खैरियत भी पुछते नहीं, ना बात करते हों…” असे या गाण्याचे बोल आहेत. सोनल प्रधानने हे गाणं लिहिलं आहे तर म्युझिकही तिनेच दिलं आहे.

नेहाची इन्स्टाग्राम पोस्ट

“खैरियत भी पुछते नहीं, ना बात करते हों”, असं म्हणत आपलं नाराजगी हे नवं गाणं रिलीज झाल्याचं नेहाने इन्स्टाग्रामवर सांगितलं आहे. या गाण्याची एक झलकही तिने पोस्ट केली आहे.

प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

“नेहा तुझा आवाज मला नेहमीचं तुझ्या प्रेमात पाडतो. तु अशीच दर्जेदार गाणी गात राहा आणि मला तुझ्या प्रेमात पाडत राहा”, असं एकाने म्हटलंय. दुसऱ्याने म्हटलंय की “गाण्याचे शब्द हृदयात घर करतात. गाण्याचं म्युजिक खूपच सुंदर आहे.”

संबंधित बातम्या

Gangubai Kathiawadi: ‘गंगुबाई काठियावाडी’ची चार दिवसांत दणक्यात कमाई; जमवला इतक्या कोटींचा गल्ला

“तर मी त्यांना ब्लॉक करेन”, फरहान-शिबानीच्या लग्नानंतर फरहानच्या पूर्व पत्नीचा संताप

‘कोण होणार करोडपती’च्या ‘हॉट सीट’वर बसण्याची संधी; तुम्ही देऊ शकाल का ‘या’ 5 प्रश्नांची उत्तरं?

Follow Us
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...