‘Bye Chacha Jack’, पराग अग्रवाल ट्विटरचे सीईओ होताच कंगना रनौतने जॅक डोर्सीची उडवली खिल्ली!

| Updated on: Nov 30, 2021 | 2:26 PM

जॅक डोर्सीच्या (Jack Dorsey) राजीनाम्यानंतर नुकतेच पराग अग्रवाल (Parag Agrawal) यांना ट्विटरचे सीईओ बनवण्यात आले आहे, ज्यावर अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) अतिशय वेगळी प्रतिक्रिया देत जॅक डोर्सीची खिल्ली उडवली आहे.

‘Bye Chacha Jack’, पराग अग्रवाल ट्विटरचे सीईओ होताच कंगना रनौतने जॅक डोर्सीची उडवली खिल्ली!
Kangna Ranaut
Follow us on

मुंबई : व्यावसायिक जगतात अनेक भारतीय आहेत, जे आपल्या उत्कृष्ट कामगिरीने जगात आपले नाव कमावत आहेत. मग ते गुगलचे सुंदर पिचाई असोत किंवा नुकतेच ट्विटरचे सीईओ म्हणून नियुक्त झालेले पराग अग्रवाल असोत. जॅक डोर्सीच्या (Jack Dorsey) राजीनाम्यानंतर नुकतेच पराग अग्रवाल (Parag Agrawal) यांना ट्विटरचे सीईओ बनवण्यात आले आहे, ज्यावर अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) अतिशय वेगळी प्रतिक्रिया देत जॅक डोर्सीची खिल्ली उडवली आहे.

कंगना आणि ट्विटरमधील युद्ध जुनेच आहे, हे कोणापासून लपून राहिलेले नाही. जॅक डोर्सीच्या नेतृत्वाखाली कंगनाचे ट्विटर अकाउंट कायमचे सस्पेंड करण्यात आले होते. यावर कंगनाने ट्विटर आणि जॅकला बरेच काही सुनावले होते. आता जॅकच्या राजीनाम्यानंतर कंगनाने ट्विटरची कमान एका भारतीयाने हाती घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. इतकेच नाही तर, जॅक डोर्सीच्या राजीनाम्याने कंगना किती खूश आहे, हे तिच्या पोस्टवरून दिसून येत आहे.

जॅकी डोर्सीच्या राजीनाम्याने कंगना आनंदली!

कंगना रनौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक ट्विट शेअर केले आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, ‘ट्विटर सीटीओ पराग अग्रवाल, जे आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी आहेत, सीईओ म्हणून जॅक डोर्सीची जागा घेत आहेत.’ हे शेअर करताना कंगनाने जॅक डोर्सीला ‘जॅक अंकल’ संबोधून त्यांना निरोप दिला आहे.

जॅक डोर्सी यांनी स्वतः राजीनाम्याची घोषणा केली!

जॅक डोर्सी यांनी सोमवारी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून सीईओ पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी जारी केलेल्या निवेदनात डॉर्सी म्हणाले की, ट्विटरबोट 16 वर्षांच्या सहवासानंतर आता पायउतार होण्याची वेळ आली आहे. त्यांनी पुढे जाहीर केले की, 45 वर्षीय भारतीय वंशाचे पराग अग्रवाल हे सीईओ म्हणून काम करतील आणि कंपनीचे नेतृत्व करतील.

यानंतर पराग अग्रवाल यांनीही ट्विटरद्वारे एक निवेदन जारी केले, ज्यामध्ये त्यांनी जॅक डोर्सी आणि संपूर्ण टीमचे मनापासून आभार आणि भविष्यातील वाटचालीसाठी खूप उत्सुक असल्याचे म्हटले आहे. विश्वास आणि पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार देखील मानले.

कंपनीला दिलेल्या निवेदनात, पराग अग्रवाल यांनी जॅक डोर्सी यांच्या सतत मार्गदर्शन आणि मैत्रीबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. त्याच वेळी, कंपनीत घालवलेला वेळ लक्षात ठेवत त्यांनी लिहिले, ‘जग आता आपल्याला पाहत आहे, पूर्वीपेक्षा जास्त. ट्विटरची पूर्ण क्षमता जगाला दाखवूया.

हेही वाचा :

Video | सारा अली खानची बडदास्त ठेवण्याच्या नादात बॉडीगार्डचा ‘पापाराझी’ला धक्का, पाहा अभिनेत्रीने पुढे काय केलं…

This Week on OTT | खून, चोरी, दरोडा आणि सस्पेन्सने भरलेला असणार येता आठवडा, पाहा कोणत्या सीरीज-चित्रपट रिलीज होणार?

Video | बापूंचा चरखा चक्क सलमान खानने चालवला! ‘अंतिम’च्या प्रमोशनसाठी ‘भाईजान’ साबरमती आश्रमात