Video | सारा अली खानची बडदास्त ठेवण्याच्या नादात बॉडीगार्डचा ‘पापाराझी’ला धक्का, पाहा अभिनेत्रीने पुढे काय केलं…

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा (Sara Ali Khan) आगामी चित्रपट 'अतरंगी रे' बद्दल (Atrangi Re) लोकांची उत्सुकता वाढत आहे. चित्रपटातील 'चका चक' (Chaka Chak) हे गाणे काल (29 नोव्हेंबर) रिलीज झाले आहे. या गाण्याच्या प्रमोशनसाठी ती मुंबईतील मिठीबाई कॉलेजमध्ये पोहोचली होती.

Video | सारा अली खानची बडदास्त ठेवण्याच्या नादात बॉडीगार्डचा ‘पापाराझी’ला धक्का, पाहा अभिनेत्रीने पुढे काय केलं...
Sara Ali Khan

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा (Sara Ali Khan) आगामी चित्रपट ‘अतरंगी रे’ बद्दल (Atrangi Re) लोकांची उत्सुकता वाढत आहे. चित्रपटातील ‘चका चक’ (Chaka Chak) हे गाणे काल (29 नोव्हेंबर) रिलीज झाले आहे. या गाण्याच्या प्रमोशनसाठी ती मुंबईतील मिठीबाई कॉलेजमध्ये पोहोचली होती. मात्र, तिथे असे काही घडले की, सारा खूप रागावून बाहेर पडताना दिसली होती. रिपोर्ट्सनुसार, तिच्या बॉडीगार्ड्सनी फोटोग्राफर्सना धक्काबुक्की केली, ज्यामुळे साराचा मूड बिघडला.

यावेळी साराने फोटोग्राफर्सची माफी देखील मागितली. सारा अली खानचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून, लोक तिचे आणि तिच्या आईच्या संस्कारांचे कौतुक करत आहेत. साराचा आगामी चित्रपट ‘अतरंगी रे’ 24 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

…अन् साराचा मूड ऑफ झाला!

सारा अली खान तिच्या पदार्पणापासूनच फोटोग्राफर्सची खूप आवडती आहे. याचे कारण ती मीडियाशी अतिशय प्रेमाने वागते. तिची पॅप्सशी चांगली मैत्री आहे आणि ती नेहमी हसत-खेळत फोटो देत असते. नुकताच तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही समजेल की, ती फोटोग्राफर्सची आवडती का आहे… व्हिडीओमध्ये सारा विचारताना दिसत आहे की, तुम्ही कोणाला धक्काबुक्की केली? फोटोग्राफर कोणीतरी रोहितचे नाव घेतात. यानंतर सारा म्हणाली, नाही-नाही, ज्यांना तुम्ही धक्का दिला ते निघून गेले. सारा बाकीच्या लोकांना सांगते की ज्यांनी त्यांना धक्का दिला, त्यांना कृपया माझ्या वतीने सॉरी म्हणा.

पाहा व्हिडीओ :

यानंतर ती बॉडीगार्डला सांगते की, तुम्ही हे असं करू नका, धक्काबुक्की करू नका, ते जवळ आले तर काही फरक पडत नाही. पलीकडून आवाज येतो, मॅडमनी धक्का दिला नाही. यानंतर सारा सर्वांना बोलते की, मला माफ करा आणि गाडीत बसून निघून जाते.

लोकांना आवडले ‘अतरंगी रे’चे गाणे

या व्हायरल व्हिडीओवर सारा अली खानचे कौतुक केले जात आहे. लोक तिचे कौतुक करत आहेत. सारा अली खानच्या ‘अतरंगी रे’ चित्रपटातील चका चक हे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. या गाण्यात ती पती धनुषच्या एंगेजमेंटमध्ये डान्स करताना दिसली आहे. हे गाणे श्रेया घोषालने गायले आहे. लोकांना हे गाणे आवडतेय. या चित्रपटात सारासोबत धनुष आणि अक्षय कुमार आहेत. हा चित्रपट आनंद एल राय यांनी दिग्दर्शीत केला आहे.

हेही वाचा :

This Week on OTT | खून, चोरी, दरोडा आणि सस्पेन्सने भरलेला असणार येता आठवडा, पाहा कोणत्या सीरीज-चित्रपट रिलीज होणार?

Video | बापूंचा चरखा चक्क सलमान खानने चालवला! ‘अंतिम’च्या प्रमोशनसाठी ‘भाईजान’ साबरमती आश्रमात


Published On - 10:39 am, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI