AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

This Week on OTT | खून, चोरी, दरोडा आणि सस्पेन्सने भरलेला असणार येता आठवडा, पाहा कोणत्या सीरीज-चित्रपट रिलीज होणार?

या आठवड्यात Netflix आणि Zee5 सारखे OTT प्लॅटफॉर्म वेब सीरीज आणि चित्रपटांनी भरलेले असणार आहेत. आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यात प्रदर्शित होणार्‍या दमदार चित्रपट आणि वेब सीरीजची खास यादी घेऊन आलो आहोत...

This Week on OTT | खून, चोरी, दरोडा आणि सस्पेन्सने भरलेला असणार येता आठवडा, पाहा कोणत्या सीरीज-चित्रपट रिलीज होणार?
OTT Release
| Edited By: | Updated on: Nov 30, 2021 | 8:00 AM
Share

मुंबई : या आठवड्यात Netflix आणि Zee5 सारखे OTT प्लॅटफॉर्म वेब सीरीज आणि चित्रपटांनी भरलेले असणार आहेत. आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यात प्रदर्शित होणार्‍या दमदार चित्रपट आणि वेब सीरीजची खास यादी घेऊन आलो आहोत. या खास यादीवर एक नजर टाकूया आणि जाणून घेऊया कोणत्या दिवशी कोणता चित्रपट आणि वेब सीरीज प्रदर्शित होणार आहे.

लॉस्ट इन स्पेस

डिसेंबर 1 – नेटफ्लिक्स

लोकप्रिय सायन्स फिक्शन वेब सीरीज ‘लॉस्ट इन स्पेस’चा नवीन सीझन 1 डिसेंबरपासून प्रदर्शित होणार आहे. तब्बल दोन वर्षांनंतर या वेब सीरीजचा नवा सीझन प्रदर्शित होत आहे. पहिला सीझन 2018 मध्ये आणि दुसरा सीझन 2019 मध्ये आला होता.

मनी हाईस्ट

डिसेंबर 3 – नेटफ्लिक्स

‘Money Heist’  ही एक स्पॅनिश वेब सीरीज आहे. ज्याचा शेवटचा सीझन 3 डिसेंबरपासून Netflix वर स्ट्रीम होईल. त्यात उर्सुला कॉर्बेरो, अल्वारो मोर्टे, इत्झियर इटुनो, पेड्रो अलोन्सो, मिगुएल हेरन, जेमे लोरेन्टे, एस्थर एसेबो दिसणार आहेत. या सीझनमध्ये प्रोफेसरच्याही जीवाला धोका असणार आहे, अशा स्थितीत हा दरोडा कसा यशस्वी होतो, याकडे प्रत्येक चाहत्याचे लक्ष लागले आहे. या वेब सीरीजबद्दल प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

इनसाईड एज सीझन 3

डिसेंबर 3 – अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ

3 डिसेंबरपासून, जगभरातील प्राईमचे सर्व सदस्य ‘इनसाईड एज सीझन 3’चे सर्व भाग पाहू शकणार आहेत. क्रिकेटचे राजकारण, ग्लॅमर, पैसा यावर आधारित यापेक्षा चांगला शो क्वचितच असेल.

बॉब बिस्वास

डिसेंबर 3 – ZEE5

‘बॉब बिस्वास’ 3 डिसेंबर रोजी ZEE5वर प्रदर्शित होईल. ‘बॉब बिस्वास’ हे सुजॉय घोषच्या 2012 मध्ये आलेल्या ‘कहानी’ चित्रपटातील एका पात्राचे नाव होते. या चित्रपटात अभिनेता शाश्वत चॅटर्जी बॉबच्या भूमिकेत दिसला होता. एक LIC एजंट होता, तो पैसे घेऊन खून करायचा. त्या चित्रपटात बॉब सहाय्यक पात्र म्हणून दिसला असला तरी आता दिया अन्नपूर्णा घोष त्याच्यावरच आधारित एक चित्रपट बनवत आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा :

‘Pushpa : The Rise’मध्ये समंथा प्रभूचा ‘आयटम नंबर’, अल्लू अर्जुनसोबत जमणार जोडी!

Chaka Chak Song Out | धनुषसह सारा अली खानचा देसी अंदाज, ‘अतरंगी रे’चे ‘चका चक’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.