Chaka Chak Song Out | धनुषसह सारा अली खानचा देसी अंदाज, ‘अतरंगी रे’चे ‘चका चक’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

अभिनेत्री सारा अली खानच्या (Sara Ali Khan) आगामी 'अतरंगी रे' (Atrangi Re) या चित्रपटातील 'चका चक' (Chaka Chaka) हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात सारा अली खानचा देसी अवतार दिसला आहे. ती खास देसी स्टाईलमध्ये डान्स करून धनुषला त्रास देताना दिसत आहे.

Chaka Chak Song Out | धनुषसह सारा अली खानचा देसी अंदाज, ‘अतरंगी रे’चे ‘चका चक’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!
Chaka Chak song

मुंबई : अभिनेत्री सारा अली खानच्या (Sara Ali Khan) आगामी ‘अतरंगी रे’ (Atrangi Re) या चित्रपटातील ‘चका चक’ (Chaka Chaka) हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात सारा अली खानचा देसी अवतार दिसला आहे. ती खास देसी स्टाईलमध्ये डान्स करून धनुषला त्रास देताना दिसत आहे. ‘अंतरंगी रे’चे हे गाणे आज म्हणजेच सोमवारी सकाळी रिलीज झाली आहे. या गाण्याचा टीझर एका दिवसापूर्वी म्हणजेच काल सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता आणि हे गाणे रिलीज होणार असल्याचे सांगण्यात आले होते. यासोबतच गाण्याच्या म्युझिकची एक छोटीशी झलकही पाहायला मिळाली.

‘अतरंगी रे’चे नवीन गाणे ‘चका चक’ सोमवारी सकाळी टी-सीरीजच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाले. हे गाणे अतिशय सुंदर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यात सारा अली खान बेफिकीर अंदाजात नाचताना दिसत आहे. तर धनुष एका मुलीसोबत लग्नसमारंभात धमाल करताना दिसत आहे. या गाण्यात धनुषचा निरागसपणा खूपच अप्रतिम आहे. धनुष जितका निरागस दिसतो, तितकीच सारा अली खान खट्याळ दिसते. सारा पिवळ्या रंगाची साडी परिधान करून धनुषभोवती नाचताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

रहमानचे संगीत आणि श्रेया घोषालच्या आवाजाची जादू!

एआर रहमानने या गाण्याला संगीत दिले आहे. रहमानच्या संगीताची जादू या गाण्यात दिसते आहे. रांझना सारख्या उत्तम संगीताचा बाज तुम्हाला पुन्हा ऐकू येईल. या चित्रपटाचे हे पहिलेच गाणे रिलीज झाले आहे. आता या चित्रपटाची आणखी बरीच गाणी रिलीज होणार आहेत. ज्यामध्ये रहमानचे संगीत अनुभवण्याची संधी मिळणार आहे. या गाण्यांना श्रेया घोषालने आवाज दिला असून, इर्शाद कामिलने या गाण्याचे बोल लिहिले आहेत. या गाण्यांची पार्श्वभूमी पाहता हे दक्षिण भारतीय स्टाईलमध्ये चित्रित करण्यात आल्याचे दिसते.

सारा अली खानच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती!

‘अतरंगी रे’ या चित्रपटात सारा अली खानसोबत अक्षय कुमार आणि धनुष मुख्य भूमिकेत आहेत. हा.चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, या चित्रपटाचे खूप कौतुक होत आहे. विशेषतः सारा अली खानने साकारलेल्या बिहारी मुलीचे पात्र खूप चर्चेत आहे. बिहारी मुलीची व्यक्तिरेखा तिने उत्तम प्रकारे टिपली आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार नाही, परंतु 24 डिसेंबर रोजी ओटिटो प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होईल. यामध्ये अक्षय कुमार पाहुण्यांच्या भूमिकेत असला, तरी महत्त्वाच्या भूमिकेत आहे. याचे दिग्दर्शन आनंद एल रॉय करत आहेत.

हेही वाचा :

Bengaluru : पोलिसांची मुन्नवर फारुकीच्या स्टँडअप शोला परवानगी नाही, परवानगी नाकारल्यानंतर फारुकी म्हणाला…

हा ट्रॅप आहे यात अडकू नका… प्रख्यात अभिनेत्री शुभांगी गोखलेंसोबत नेमकं काय घडलं?

Priyanka chopra : matrix resurrections च्या नव्या व्हिडिओत प्रियंकाच्या अदांवर चाहते फिदा, हा हटके अंदाज पाहा


Published On - 1:53 pm, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI