‘Pushpa : The Rise’मध्ये समंथा प्रभूचा ‘आयटम नंबर’, अल्लू अर्जुनसोबत जमणार जोडी!

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू गेल्या काही काळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. परंतु, आता अभिनेत्री या सर्वांकडे दुर्लक्ष करत आहे आणि तिच्या व्यावसायिक जीवनावर लक्ष केंद्रित करत आहे. समंथाने सोमवारपासून अल्लू अर्जुनचा तेलुगू अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘पुष्पा’च्या शुटींगला सुरुवात केली आहे.

‘Pushpa : The Rise’मध्ये समंथा प्रभूचा ‘आयटम नंबर’, अल्लू अर्जुनसोबत जमणार जोडी!
Samantha-Allu Arjun

मुंबई : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू गेल्या काही काळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. परंतु, आता अभिनेत्री या सर्वांकडे दुर्लक्ष करत आहे आणि तिच्या व्यावसायिक जीवनावर लक्ष केंद्रित करत आहे. समंथाने सोमवारपासून अल्लू अर्जुनचा तेलुगू अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘पुष्पा’च्या शुटींगला सुरुवात केली आहे. या चित्रपटात ती एक स्पेशल डान्स नंबर करणार आहे. समंथाच्या करिअरमधील हा तिचा पहिला डान्स नंबर असणार आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतेच जाहीर केले होते की, समंथा अल्लू अर्जुनसोबत चित्रपटाच्या चौथ्या गाण्यात झळकणार आहे. दोघेही एकत्र डान्स करणार असून लवकरच या गाण्याचा व्हिडीओ रिलीज होणार आहे. या खास गाण्यासाठी जेव्हा ते समंथाकडे गेले होते, तेव्हा तिने देखील आनंदाने ही ऑफर स्वीकारल्याचेही त्यांनी सांगितले.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, समंथा हे गाणे एका खास सेटमध्ये शूट करणार आहे. गणेश आचार्य हे गाणे दिग्दर्शित करणार असून, पहिल्यांदाच समंथाचा डान्स नंबर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे गाणे खूप मनोरंजक होणार आहे.

समंथाचे हॉलिवूड पदार्पण

अलीकडेच अशी बातमी आली होती की, समंथा हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती दिग्दर्शक फिलिप जॉन यांच्या ‘अरेंजमेंट ऑफ लव्ह’ या चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटात ती एका बायसेक्शुअल मुलीची भूमिका साकारत आहे, जिची स्वतःची डिटेक्टिव्ह एजन्सी आहे.

याशिवाय ती ‘काथू वाकुला रेंदू कादल’  या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटातील समांथाच्या लूकचे पोस्टर रिलीज झाले आहे, ज्याला चांगलीच पसंती मिळाली आहे. समंथाला वेगवेगळ्या अवतारात पाहण्यासाठी चाहते उत्सुक असले तरी, सर्वप्रथम त्यांना ‘पुष्पा’ चित्रपटातील समंथा आणि अल्लूचा डान्स नंबर पाहायचा आहे.

पुष्पा : द राईज

‘पुष्पा : द राईज’ या चित्रपटाबद्दल सांगायचे, तर अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक सुकुमार यांचा हा तिसरा चित्रपट आहे. याआधी ‘गोनो आर्या’ आणि ‘आर्या 2’ यासारख्या हिट चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केले आहे. या चित्रपटाला संगीत देवी श्रीप्रसाद यांनी दिले आहे.

‘पुष्पा’ हा अल्लू अर्जुनची देखील बॉलिवूड डेब्यू असणार आहे. कारण हा चित्रपट हिंदीमध्ये देखील डब केला जाणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग 17 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अर्जुन एका ट्रक ड्रायव्हरच्या भूमिकेत दिसणार आहे, जो लाल चंदनाची तस्करी करतो. या चित्रपटात अर्जुन व्यतिरिक्त फहाद फासिल, रश्मिका मंदान्ना आणि जगपती बाबू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

अल्लू अर्जुन शेवटचा ‘आला वैकुंतापुरमलो’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने 200 कोटींहून अधिक कमाई केली होती. ज्यात पूजा हेगडे आणि निवेथा पेथुराज हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले होते.

हेही वाचा :

Bengaluru : पोलिसांची मुन्नवर फारुकीच्या स्टँडअप शोला परवानगी नाही, परवानगी नाकारल्यानंतर फारुकी म्हणाला…

हा ट्रॅप आहे यात अडकू नका… प्रख्यात अभिनेत्री शुभांगी गोखलेंसोबत नेमकं काय घडलं?

Priyanka chopra : matrix resurrections च्या नव्या व्हिडिओत प्रियंकाच्या अदांवर चाहते फिदा, हा हटके अंदाज पाहा


Published On - 3:22 pm, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI