Jimmy Shergill Arrested | कोरोनाचे नियम मोडले, अभिनेता जिमी शेरगिलला लुधियानात अटक!

बॉलिवूड आणि पंजाबी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता जिमी शेरगिल (Jimmy Shergill) याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. कोरोना गाईडलाईन्सचे उल्लंघन केल्याबद्दल अभिनेत्याला अटक करण्यात आल्याचे समोर आले आहे.

Jimmy Shergill Arrested | कोरोनाचे नियम मोडले, अभिनेता जिमी शेरगिलला लुधियानात अटक!
जिमी शेरगिल

मुंबई : बॉलिवूड आणि पंजाबी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता जिमी शेरगिल (Jimmy Shergill) याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. कोरोना गाईडलाईन्सचे उल्लंघन केल्याबद्दल अभिनेत्याला अटक करण्यात आल्याचे समोर आले आहे. यापूर्वी मंगळवारी नियमांचे उल्लंघन करत चित्रीकरण केल्याप्रकरणी त्याच्यासह संपूर्ण टीमचे चलान कापण्यात आले होते. परंतु बुधवारीसुद्धा या अभिनेत्याने सोशल डिस्टेंसिंग आणि इतर नियमांचे उल्लंघन करत शूट केले (Corona Guidelines violation Jimmy Shergill Arrested by Ludhiana police).

पंजाबच्या लुधियाना येथील आर्या शाळेत अनेक वाहने दिसली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. अभिनेता जिमी शेरगिल आपल्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी येथे येणार होता. आर्या स्कूलमध्ये लुधियाना सत्र न्यायालयाचा एक सेट बांधला गेला होता. यानंतर पोलिसांना ही बातमी समजताच एसीपी वरीयम सिंग स्वत: घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्रथम शूटिंग थांबवली. त्यानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शकाने त्यांना चित्रपटाच्या शूटिंगसाठी मान्यतापत्रे दाखवली. यानंतर तेथे सामाजिक अंतर न पाळणाऱ्या दिग्दर्शकांसह दोन हजार लोकांना दंड ठोठावण्यात आला आहे.

जिमी शेरगिलला अटक

 (Corona Guidelines violation Jimmy Shergill Arrested by Ludhiana police)

मंगळवारी उशिरा पोलिसांना रात्रीच्या कर्फ्यू दरम्यान शूटिंग सुरू असल्याची माहिती मिळाली आणि सेटवर जवळपास दीडशे लोक उपस्थित होते. पोलिसांनी पुन्हा छापा टाकला तेव्हा हे आरोप योग्य असल्याचे सिद्ध झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत जिमी शेरगिलसह 4 जणांना अटक केली. त्यांच्याविरोधात शासकीय आदेशाचे उल्लंघन करणे, साथीच्या आजारचे अधिनियम आणि इतर कलमांतर्गत गुन्हे दाखल करत त्यांना  त्यांना अटक केली आहे.

पंजाबमध्ये वाढतोय कोरोना

पंजाबमध्ये कोरोनाचा कहर सतत वाढत आहे. ज्यामुळे सरकारने कर्फ्यू लादला आहे. राज्यात दररोज संध्याकाळी पाच वाजता दुकाने बंद ठेवण्याच्या आदेशासह, शनिवार व रविवार लॉकडाउनही लागू करण्यात आला आहे. यासह सरकारने आणखी बरेच निर्बंध लादले आहेत, असे असूनही काही लोक कोरोनाच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन करीत आहेत. ज्यांच्याविरूद्ध प्रशासन सातत्याने कारवाई करत आहे. म्हणूनच, प्रशासनाने जिमी शेरगिललाही अटक केली आहे.

(Corona Guidelines violation Jimmy Shergill Arrested by Ludhiana police)

हेही वाचा :

VIDEO | “तू बुधवार पेठेतील ** आहेस” इन्स्टाग्राम युझरच्या कमेंटवर मानसी नाईकचं लाईव्ह उत्तर

Video | अभिनयच नाही तर, क्रिकेटही रश्मिकाची आवड, आवडती IPL टीम विचारताच म्हणाली….

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI