Rangbaaz Phirse Trailer : पुन्हा होणार रंगबाजी! ‘रंगबाज फिरसे,’ चा ट्रेलर लाँच

झी-5 या अॅपवर गाजलेली सीरीज म्हणजे 'रंगबाज', उत्तर प्रदेशच्या गोरखपूरच्या कुप्रसिद्ध श्रीप्रकाश शुक्लाच्या जीवनावर आधारित या वेबसीरीजला (zee five rangbaaz phirse web series)  चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Rangbaaz Phirse Trailer : पुन्हा होणार रंगबाजी! 'रंगबाज फिरसे,' चा ट्रेलर लाँच
Follow us
| Updated on: Nov 21, 2019 | 10:41 PM

मुंबई : झी-5 या अॅपवर गाजलेली सीरीज म्हणजे ‘रंगबाज’, उत्तर प्रदेशच्या गोरखपूरच्या कुप्रसिद्ध श्रीप्रकाश शुक्लाच्या जीवनावर आधारित या वेबसीरीजला (zee five rangbaaz phirse web series)  चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सीरीजमध्ये श्रीप्रकाश शुक्लाचा रोल साकीब सलीमनं केला होता. तर त्याच्या सोबतीला आहना कुमरा, रवी किशन, तिग्मांशू धुलियासारखे दिग्गज होते. जबरदस्त कन्टेट आणि स्टोरीमुळे ही सीरीज गाजली. आता झी-5 रंगबाजचं सीक्वल आणायचं ठरवलं आहे. या सीक्वलचं नाव आहे ‘रंगबाज फिर से’. यावेळी ही सीरीज (zee five rangbaaz phirse web series) उत्तरप्रदेश नाही तर राजस्थानच्या एका गँगस्टरच्या जीवनावर आधारित आहे. या गँगस्टरचं नाव अमरपाल सिंह, असं आहे.

कोण आहे अमरपाल सिंह?

सीरिजमध्ये जरी नाव अमरपाल सिंह असलं तरी असं म्हटलं जातं आहे की, प्रत्यक्षात राजस्थानच्या कुप्रसिद्ध आनंदपाल सिंह या गँगस्टरच्या जीवनावर आधारित आहे. 24 जून 2017 म्हणजे अवघ्या दीड वर्षापूर्वीच पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये आनंद पालचा खात्मा केला होता. आनंदपाल सिंह स्वतःला राजस्थानचा रॉबिनहुड म्हणून घेत असे. आनंद पाल सिंह आणि सीरिजमधील जिमीचा लूक डिट्टो सेम टू सेम आहे.

रंगबाज तो खत्म हो सकता है लेकिन, शरीर में खून से भी तेज दौडनेवाली रंगबाजी नही या इंट्रोनं सुरू होणाऱ्या रंगबाज फिरसेच्या ट्रेलरला आवाज दिला आहे. अभिनेता मोहम्मद झीशान अयूबनं जो या सीरिजमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.

पहिल्या सीरिजला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे झी-5नं दुसऱ्या सीरिजसाठी तगडी स्टारकास्ट निवडली आहे. गँगस्टर अमरपाल सिंहच्या भूमिकेत हरहुन्नरी अभिनेता जिमी शेरगील दिसणार आहे. तसेच सोबतीला शरद केळकर, सुशांत सिंह, हर्ष छाया, गुल पनाग अशी स्टारकास्ट आहेत.

रंगबाज फिरसे चा ट्रेलर

रंगबाजची कथा ही नेहमीच्या पठडीतीलच आहे. सत्तेच्या सारीपाटावर बाहूबली गँगस्टार्सचा वापर करुन घ्यायचा आणि त्यांची गरज संपली किंवा ते डोईजड व्हायला लागले की त्यांचा खात्मा करायचा. मात्र, कथा माहित असली तरी अशा वेबसीरीजला प्रचंड प्रतिसाद मिळण्याचं मूळ तीच्या कथेमध्ये दडलेलं असतं. रंगबाजची कथा थोडी रंगवलेली असली तरी ती एका रियल लाईफ गँगस्टरच्या जीवनावर आधारलेली असते त्यामुळे प्रेक्षक तिला पसंत करतात.

प्रत्येक वेबसीरिजची खासियत असते तिचे डायलॉग. हे डायलॉग ठरवतात की ही वेबसीरिज हीट की फ्लॉप आणि रंगबाज फिर सेचे डायलॉग्स एका पेक्षा एक ‘तोडू’ कॅटेगिरीतील आहेत.

रंगबाज फिर से मधील डायलॉग्स

-कुछ लोगों के साथ गलत करो, तो वह पूरी दुनिया को ठीक कर देते हैं।

-ताकत और रूतबे से भरी रंगबाजी, एक जरूरत नहीं…आदत बन जाती है।

-रंगबाज़ तो ख़त्म हो सकता है, लेकिन शरीर में खून से भी तेज दौड़ने वाली रंगबाज़ी नहीं।

-अमरपाल सिंह सरकार बनावा भी सकता है… और गिरावा भी सकता है।

-पेड़ की डाल जब बहुत बड़ी हो जाती हैं ना, तो तूफान आने से पहले उसे काट देना चाहिए।

-एक बार बंदूक से गोली निकल गई… तो बंदूक जाने और निशान जाने… चलाने वाला सिर्फ देख सकता है।

इयर एंडला बाकी काही प्लॅन नसेल तर रंगबाज फिर से ही 9 एपिसोड्सची सीरीज नक्की पाहिली जाऊ शकते. झी-5 वर ही सीरीज 20 डिसेंबरला स्ट्रीम होणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.