दादांच्या पार्थिवाजवळच बाळासाहेब जमिनीवर बसले, कपाळावरून हात फिरवत होते… तो प्रसंग सांगताना लेखिकाही भावूक

प्रसिद्ध लेखिका अनिता पाध्ये यांनी दादा कोंडकेंच्या आठवणींना उजाळा दिला. दादांच्या निधनावेळी बाळासाहेब ठाकरे जमिनीवर बसून भावूक झाले होते, हा प्रसंग त्यांनी सांगितला. दादांचा हजरजबाबी स्वभाव, माणूसपण आणि कलाकारांनी चाहत्यांशी अंतर राखावे ही त्यांची दूरदृष्टी पाध्ये यांनी उलगडली. हे सर्व सांगताना लेखिका स्वतःही भावूक झाल्या.

दादांच्या पार्थिवाजवळच बाळासाहेब जमिनीवर बसले, कपाळावरून हात फिरवत होते... तो प्रसंग सांगताना लेखिकाही भावूक
dada kondke
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 30, 2026 | 3:10 PM

प्रसिद्ध लेखिका आणि ज्येष्ठ पत्रकार अनिता पाध्ये यांनी लोकप्रिय अभिनेते दादा कोंडके यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दादांचा स्वभाव, हजरजबाबीपणा आणि दादांचं माणूसपण यावर त्या भरभरून बोलल्या. दादा कोंडके गेले त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? हे सांगताना लेखिका भावूक झाली होती. रात्रीच्यावेळीच दादांना अटॅक आला होता. रुग्णालयात जाण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं होतं. त्यावेळी दादांचा मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णवाहिकाही मिळू शकली नव्हती, अशी खंत अनिता पाध्ये यांनी व्यक्त केलीय.

अनिता पाध्ये यांनी लोकमत फिल्मीला दिलेली मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत त्यांनी दादा कोंडके आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे किती घट्ट संबंध होते, याच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. दादा कोंडके दादरला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहायचे. आम्ही दादांचे प्रेत त्यांच्या रुममध्ये घेऊन गेलो. संध्याकाळी त्यांची बहीण आल्यावर दादांवर अंतिमसंस्कार करण्यात आले. हिंदी, मराठीतील अनेक सेलिब्रिटी दादांना अखेरचा निरोप द्यायला आले होते. त्यावेळी छगन भुजबळांनी नुकतीच शिवसेना सोडली होती. तेही आले होते. बाळासाहेब ठाकरे आले होते. बाळासाहेब दादांच्या मृतदेहाशेजारी खाली जमिनीवर बसले होते. ते दादांच्या कपाळावरून हात फिरवत होते, असं सांगताना अनिता पाध्ये भावूक झाल्या.

Loading...

अन् गप्पांची मैफिल रंगायची

बाळासाहेब ठाकरे कधी अपसेट झाले किंवा कुणावर चिडले तर मीनाताई दादांना फोन करायच्या. दादांना घरी बोलवायच्या. मग दादा आणि बाळासाहेबांच्या गप्पा रंगायच्या. हास्यविनोद व्हायचे आणि वातावरण नॉर्मल व्हायचं. दादांचा स्वभाव विनोदी होता. ते जंगलात गेले तरी माकडाची अ‍ॅक्टिंग करून दाखवायचे. ते अतिशय बोलघेवडे होते आणि डाऊन टू अर्थ होते, असंही पाध्ये म्हणाल्या.

दादांना ते कळालं होतं…

स्टार्स म्हणजे काय? तर तारा. तारा आकाशात असतो. आजच्या कलाकारांना तो स्टार आहे हे कळत नाही. जसं तारा आणि पृथ्वीत अंतर असतं, तसं चाहता आणि आपल्यात अंतर पाहिजे हे आजच्या कलाकारांना समजत नाही. हे मात्र दादांनी ओळखलं होतं. त्यामुळे दादा कुणाच्या फंक्शनला जात नसत. कुणाच्या लग्नाला किंवा एखाद्या कार्यक्रमाला ते जायचे नाही. एखादा कलाकार सारखा सारखा दिसू लागला तर त्याची किंमत शून्य होते, असं दादा म्हणायचे. ही त्यांची दुरदृष्टी होती, असं त्यांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us