राखी सावंत हिच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन; अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर

राखीच्या आईला बघायला वॉर्डात गेल्यानंतर अर्ध्या तासात डॉक्टरांनी राखीच्या आईला मृत घोषित केलं. राखीच्या आईचं पार्थिव शरीर जुहूच्या क्रिटिकेअर रुग्णालयात नेलं जाईल. सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जातील.

राखी सावंत हिच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन; अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 11:08 PM

मुंबई : राखी सावंत यांची आई जया भेदा (Jaya Bheda) यांचे निधन झाले. जया भेदा यांना मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल केले होते. राखी सावंत (Rakhi Sawant) यांनी व्हिडीओ पोस्ट करून आईची प्रकृती बरी नसल्याचं सांगितलं होतं. राखी सावंत यांची आई ब्रेन ट्यूमरनं पीडित होत्या. हा ट्युमर फुफ्फुसापर्यंत पसरल्याचं राखी सावंतला माहिती होतं. माझ्या आईसाठी प्रार्थना करा, अशी विनंती तिनं केली होती. परंतु, आता राखी सावंत यांच्या आईचं निधन झालं.

गेल्या काही वर्षांपासून राखी सावंत यांची आई ट्यूमरने पीडित होती. सलमान खानसह काही सेलिब्रेटीजनी त्यांना मदत केली होती. आईच्या प्रकृतीवरून कित्तेकदा राखी सावंत भावूक झाल्याचे पाहायला मिळत होते.

या मैत्रिणीने केला खुलासा

राखी सावंतच्या टीममधून तिची मैत्रीण राजश्री मोरे हिने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राजश्री या राखी सावंतच्या आईला बघायला रुग्णालयात आल्या होत्या.

राखीच्या आईला बघायला वॉर्डात गेल्यानंतर अर्ध्या तासात डॉक्टरांनी राखीच्या आईला मृत घोषित केलं. राखीच्या आईचं पार्थिव शरीर जुहूच्या क्रिटिकेअर रुग्णालयात नेलं जाईल. सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जातील.

राखी सावंत आईवरून भावूक

राखी सावंत आपल्या आईच्या खूप जवळ होती. बिग बॉसच्या घरातही कित्तेकदा राखी सावंत आईवरून भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

राखी सावंतने आदिलसह आईच्या इच्छेखातर लग्न केलं होतं. राखी आणि आदिल यांचं लग्न ७ महिन्यांपूर्वी झालं. या लग्नाचा खुलासा नुकताच झाला.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.