AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नुसता टॅक्स फ्री कशाला? ‘द काश्मीर फाईल्स’ यूट्यूबवर टाका सगळ्यांना मोफत बघता येईल- Arvind Kejriwal

Arvind Kejriwal on The Kashmir Files Movie : आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाविषयी आपलं मत मांडलं. "टॅक्स फ्री करण्यापेक्षा हा सिनेमा यूट्यूबवर टाका सगळ्याना तो मोफत पाहता येईल", असं केजरीवाल म्हणाले.

नुसता टॅक्स फ्री कशाला? 'द काश्मीर फाईल्स' यूट्यूबवर टाका सगळ्यांना मोफत बघता येईल- Arvind Kejriwal
दिल्लीचे मुख्यमंत्री,विवेक अग्निहोत्रीImage Credit source: TV9
| Updated on: Mar 25, 2022 | 11:53 AM
Share

नवी दिल्ली : ‘द काश्मिर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटावरुन सध्या देशाचं राजकारण आणि समाजकारण ढवळून निघालंय. सामाजिक क्षेत्रासोबतच राजकीय मंडळीही या सिनेमाबाबत बोलताना दिसत आहेत. अश्यातच आता दिल्लीच्या विधानसभेतही (Delhi Legislative Assembly) या सिनेमावर चर्चा झाली. दिल्लीतही भाजपकडून द काश्मिर फाईल्स करमुक्त करण्याची मागणी करण्यात आली. त्यावरुन विधानभेत बोलताना आम आदमी पक्षाचे (AAP) अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आपलं मत मांडलं. “टॅक्स फ्री करण्यापेक्षा हा सिनेमा यूट्यूबवर टाका सगळ्याना तो मोफत पाहता येईल”, असं केजरीवाल म्हणालेत.

‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटाला मिळणारा लोकांचा प्रतिसाद आणि कमाईच्या आकड्यांवरुन सध्या रोजदार चर्चा होतेय. काही भाजपशासित राज्यात हा चित्रपत करमुक्त करण्यात आलाय. दिल्लीतही भाजपकडून द काश्मिर फाईल्स करमुक्त करण्याची मागणी करण्यात आली. त्यावरुन विधानभेत बोलताना आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. “8 वर्ष देश चालवल्यानंतर जर कुठल्या पंतप्रधानांना विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी लोळण घ्यावे लागले, तर त्याचा अर्थ होतो की 8 वर्षे त्या पंतप्रधानांनी काहीही काम केलेलं नाही”, अशा शब्दात केजरीवाल यांनी मोदींवर हल्ला चढवला.

…याचा अर्थ मोदींनी 8 वर्षात काहीच काम केलं नाही- केजरीवाल

अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. “संपूर्ण भारतीय जनता पार्टी देशभरात एका चित्रपटाचे पोस्टर लावत आहे. असे चित्रपटाचे पोस्टर लावण्यासाठी तुम्ही राजकारणात आले होते काय? तुमच्या मुलांना काय उत्तर द्याल घरी जाऊन? मुलं विचारतील बाबा काय काम करता? त्यांना सांगाल का चित्रपटाचे पोस्टर लावतो म्हणून. 8 वर्ष देश चालवल्यानंतर जर कुठल्या पंतप्रधानांना विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी लोळण घ्यावे लागले, तर त्याचा अर्थ होतो की 8 वर्षे त्या पंतप्रधानांनी काहीही काम केलेलं नाही. 8 वर्षे खराब केले. विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी त्यांना लोळण घ्यावं लागत आहे की, वाचव वाचव म्हणून…” अशा शब्दात अरविंद केरजीवाल यांनी द काश्मिर फाईल्सच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.

संबंधित बातम्या

RRR Public Review | अद्भूत, जबरदस्त, थरारक… प्रेक्षकांकडून शिट्ट्यांची सलामी, ‘RRR’ पाहून पब्लिक क्या बोलती?

Chandramukhi Movie : “Amruta Khanvilkar पेक्षा मी चांगली चंद्रमुखी साकारली असती”, Mansi Naikचा दावा

‘RRR’ first review | ‘RRR..’खतरनाक , Ram charan, Jr NTR यांचा फुल पैसा वसूल परफॉर्मन्स

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.