डोळे तपासताना डॉक्टरने केला चुकीचा स्पर्श, टेलरकडूनही वाईट कृत्य, नीना गुप्तांनी सांगितले आयुष्यातील वाईट अनुभव!

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) आपले प्रत्येक मत अगदी स्पष्टपणे व्यक्त करतात. अभिनेत्रीने स्वत:च्या आयुष्याशी संबंधित कोणतेही रहस्य गुप्त राहू दिले नाही. या वयातही अभिनेत्री तिच्या बोल्ड स्टाईलसाठी ओळखली जाते. नीना गुप्त अगदी बेधडकणे लोकांसमोर आपल्या आयुष्यातील कटू कथा सांगतात.

डोळे तपासताना डॉक्टरने केला चुकीचा स्पर्श, टेलरकडूनही वाईट कृत्य, नीना गुप्तांनी सांगितले आयुष्यातील वाईट अनुभव!
Neena Gupta

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) आपले प्रत्येक मत अगदी स्पष्टपणे व्यक्त करतात. अभिनेत्रीने स्वत:च्या आयुष्याशी संबंधित कोणतेही रहस्य गुप्त राहू दिले नाही. या वयातही अभिनेत्री तिच्या बोल्ड स्टाईलसाठी ओळखली जाते. नीना गुप्त अगदी बेधडकणे लोकांसमोर आपल्या आयुष्यातील कटू कथा सांगतात. एकदा त्यांनी आपल्या जीवनातील अनेक गडद रहस्य लोकांसोबत शेअर केली होती. आता त्यांनी त्यांच्या लहानपणीची वेदनादायक कहाणी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

डॉक्टरांनी केला चुकीचा स्पर्श

नीना गुप्ता यांनी आपल्या ‘सच कहूं तो’ या आत्मचरित्रात सांगितले आहे की, त्या एकदा ऑप्टिशियनला भेटायला गेल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ होता, ज्याला बाहेर थांबायला सांगितले होते. त्या पुढे लिहितात की, ‘डॉक्टरांनी माझ्या डोळ्याची तपासणी सुरू केली आणि त्याने हळू हळू त्यांनी चुकीचा स्पर्श करण्यास सुरुवात केली, ज्या भागांचा डोळ्यांशी काहीही संबंध नव्हता. जेव्हा हे घडत होते तेव्हा मी खूप घाबरले होते आणि घरी येऊन मला माझाच तिरस्कार वाटत होता.’

अशीच घटना अनेक वेळा घडली

नीना गुप्ता पुढे लिहितात, ‘जेव्हा कोणी बघत नव्हते, तेव्हा मी घराच्या कोपऱ्यात बसून खूप रडायचो. पण मी आईला सांगायची हिम्मत करू शकले नाही. मला भीती वाटली की, तिला सुद्धा यात माझी चूक वाटेल. ती म्हणेल की, मी असे कृत्य केले असावे, त्यानंतर त्याने तसे केले. डॉक्टरांच्या ठिकाणी हे माझ्यासोबत अनेक वेळा घडले आहे.’

टेलरनेही केले घाणेरडे कृत्य

नीना गुप्ता यांनी आणखी एक किस्सा शेअर केला, जो टेलरच्या ठिकाणी घडला होता. त्या म्हणतात, ‘मोजमाप घेताना टेलर इथे आणि तिथे स्पर्श करणे खूप सोपे होते. या घटनेनंतरही, मला परत जावे लागले होते. कारण मला असे वाटू लागले की, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. जर मी माझ्या आईला सांगितले की, मला त्याच्याकडे जायचे नाही, तर ती मला विचारेल आणि मला तिला सांगावे लागेल.’

सोशल मीडियावरही चर्चेत!

अभिनेत्री नीना गुप्ता सोशल मीडियावर त्यांच्या बेधडक स्टाईलसाठी खूप प्रसिद्ध आहेत. नीना त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो आणि व्हिडीओद्वारे चाहत्यांशी जोडलेल्या राहतात. त्याचबरोबर चाहत्यांनाही त्यांची शैली खूप आवडते. नीना गुप्ता यांनी 2018 मध्ये ‘बधाई हो’ या चित्रपटाद्वारे शानदार पुनरागमन केले होते. या चित्रपटात त्या आयुषमान खुरानाच्या आईच्या भूमिकेत दिसल्या होत्या. याशिवाय, त्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ आणि वेब सीरीज ‘पंचायत’ मध्ये देखील दिसल्या होत्या. सध्या नीना तिच्या आगामी ‘गुडबाय’ चित्रपटाबद्दल खूप उत्साहित आहे. या चित्रपटात त्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय त्या नुकत्याच ‘सरदार का ग्रँड सन’मध्येही दिसल्या होत्या.

हेही वाचा :

जमिनीवर पडली आणि काही मिनिटांतच गमावला जीव, अभिनेत्रीच्या मृत्यूने मनोरंजन विश्वावर शोककळा!

‘हे एक बाईच कसं बोलू शकते”,  ‘पदर नीट घेतला असतास तर…’ म्हणणाऱ्या चाहतीला हेमांगी कवीने सुनावले खडे बोल!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI