काळजाचा ठोकाच चुकला! हवेत उलटली SUV, थेट व्हॅनवर आदळली; इमरान हाशमी थोडक्यात बचावला?

इम्रान हाश्मीच्या आगामी 'गनमास्टर G9' सिनेमाच्या सेटवरील एका धोकादायक कार स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एक एसयूव्ही हवेत पलटी होऊन व्हॅनवर आदळताना दिसते, ज्यामुळे सेटवर मोठी खळबळ उडाली. या थरारक घटनेत इम्रान हाश्मी थोडक्यात बचावल्याची चर्चा असून, २७ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. मात्र, घटनेची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

काळजाचा ठोकाच चुकला! हवेत उलटली SUV, थेट व्हॅनवर आदळली; इमरान हाशमी थोडक्यात बचावला?
Emraan Hashmi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 13, 2026 | 11:19 PM

अभिनेता इमरान हाशमी सध्या आवारापन 2 च्या यशानंतर पुढच्या सिनेमाच्या तयारीत आहे. नोव्हेंबरमध्ये त्याचा गनमास्टर जी 9 हा रोमांटिक अॅक्शन सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात जेनेलिया डिसूजा त्याची हिरोईन आहे. काही आठवड्यातच हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याने इमरानसह त्याच्या चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता लागली आहे. मात्र, त्यापूर्वी या सिनेमाच्या सेटवरचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

सध्या सोशल मीडियावर एक BTS व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ गनमास्टर जी9 चा असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओत एक खतरनाक कारचा स्टंट दाखवलेला आहे. यात एक SUV कार हवेत उंच उडून पलटते आणि त्यानंतर खाली उभ्या असलेल्या एका व्हॅनवर येऊन दाणकन आदळताना दिसत आहे. मोकळ्या मैदानात कारचा हा स्टंट सुरू असल्याची तयारीही या व्हिडीओत दिसत आहे.

Loading...

उलटी गणती अन्…

या मोकळ्या मैदानात एका मोठ्या क्रेनच्या मदतीने SUV कारला हवेत लटकवण्यात आलं आहे. त्याच्या आजूबाजूला सिनेमाशी संबंधित लोक आणि इतर लोक उभे राहून हा स्टंट पाहत आहेत. स्टंट सुरू होण्याच्या पूर्वी उलटी गणतीही करण्यात येते. गणती जशी संपते तोच क्रेनला बांधलेली SUV कार अचानक हवेत उलटी पालटी होताना दिसत आहे. त्यानंतर ही कार खाली येताना दिसते. त्यानंतर ही कार खाली उभ्या असलेल्या काळ्या व्हॅनच्या टपावर दाणकन आपटताना दिसत आहे. या घटनेनंतर तिथे असलेले लोक आणि शुटिंग पाहण्यासाठी आलेले लोक कारच्या दिशेने पळताना दिसत आहेत.

 

इमरान थोडक्यात बचावला

या स्टंटच्यावेळी इमरान हाशमीही तिथे होता आणि कार त्यांच्या चेहऱ्याच्या अगदी जवळून गेल्याचा दावा केला जात आहे. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. इमरान हाशमी थोडक्यात बचावले. जर काही चुकीचं घडलं असतं, तर इमरान हाशमी गंभीर जखमी झाले असते. त्यांना प्रचंड दुखापत होऊ शकली असती. दरम्यान, या व्हायरल व्हिडीओत इमरान दिसत नाहीये. त्यामुळे इमरान तिथेच होता की नाही? याची पुष्टी कुणी केली नाही. मात्र, इमरानच्या सिनेमाशी निगडीत हा स्टंट असल्याने इमरानच बचावल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या व्हिडीओबाबत सिनेमाशी संबंधित कोणीही काहीच दुजोरा दिलेला नाही. इमरानचा हा सिनेमा येत्या 27 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. त्याच दिवशी आयुष्यमान खुराना चा ये प्रेम मोल हा सिनेमाही येत आहे. सूरज बडजात्या या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us