Toofan Trailer Review | फरहानचा दमदार ‘अज्जू भाई’, परेश रावलही कोचच्या भूमिकेत अव्वल! पाहा ‘तूफान’चा ट्रेलर

गेल्या काही काळापासून फरहान अख्तरचा ‘तूफान’ (Toofan) हा चित्रपट चर्चेत आला आहे. या चित्रपटात फरहान अख्तर (Farhan Akhtar)  याने बॉक्सर अजीज अलीची भूमिका साकारली आहे. ‘तूफान’ हा चित्रपट Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे.

Toofan Trailer Review | फरहानचा दमदार ‘अज्जू भाई’, परेश रावलही कोचच्या भूमिकेत अव्वल! पाहा ‘तूफान’चा ट्रेलर
तूफान
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 4:41 PM

मुंबई : गेल्या काही काळापासून फरहान अख्तरचा ‘तूफान’ (Toofan) हा चित्रपट चर्चेत आला आहे. या चित्रपटात फरहान अख्तर (Farhan Akhtar)  याने बॉक्सर अजीज अलीची भूमिका साकारली आहे. ‘तूफान’ हा चित्रपट Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे. नुकताच या ट्रेलर रिलीज करण्यात आला. ट्रेलर पाहिल्यानंतर तो चित्रपटाच्या नावाप्रमाणेच ‘तूफान’ आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही (Farhan Akhtar, Mrunal Thakur, Paresh Rawal starrer Film Toofan Trailer review).

काय आहे चित्रपटाची कथा?

ट्रेलर पाहता या चित्रपटाची कहाणी एका जिद्दी बॉक्सरची उत्कटता दर्शवते. अजीज अली (फरहान अख्तर) हा एक रस्त्यावर मारमारी करणारा तरुण आहे, जो उत्तम बॉक्सिंग करू शकतो. एका मारहाणी दरम्यान त्याला दुखापत होते आणि तो दवाखान्यात जातो. तिथे त्याच्यावर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरच्या (मृणाल ठाकूर) प्रेमात पडतो. हीच डॉक्टर पुढे अझीझचा राग ‘बॉक्सिंग’कडे वळवते. कालांतराने अजीजची भेट बॉक्सिंग कोच नाना प्रभू (परेश रावल) यांच्याशी होते. नाना अजीजला बॉक्सर बनण्यासाठी अतिशय कठोर ट्रेनिंग देतात.

परंतु, या दरम्यान असे काहीतरी घडते की, अजीजवर 5 वर्षांसाठी बंदी घालण्यात येते. मात्र, आता त्यांची पत्नी बनलेली डॉक्टर अजीजला पुन्हा एकदा बॉक्सिंगच्या रिंगमध्ये परतण्यासाठी प्रोत्साहित करते. आता अजीज पुन्हा आपला गेलेला मान आणि यश कसा परत मिळवतो, यावर या चित्रपटाची कथा आधारित आहे.

फरहान, मृणाल आणि परेश रावल यांची जबरदस्त भूमिका!

‘तूफान’ या चित्रपटाच्या नावाप्रमाणेच तूफानचा ट्रेलर देखील आहे. हा चित्रपट तसा फरहान अख्तरवर केंद्रित आहे. पण, परेश रावल आणि मृणाल ठाकूर यांच्या भूमिकेला देखील पुरेसे महत्त्व देण्यात आले आहे. फरहान अख्तरने यापूर्वी मिल्खा सिंह यांचा बायोपिक ‘भाग मिल्खा भाग’ मध्ये काम केले होते. या चित्रपटाच्या निमित्ताने तो पुन्हा एकदा एका खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. नेहमीप्रमाणेच त्याची या भूमिकेसाठीची कठोर मेहनत ट्रेलरमध्ये पाहायला मिळते आहे.

फरहानने आपल्या शरीरावर आणि बॉक्सिंग शिकण्यावर खूप मेहनत घेतली आहे आणि ती या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसते आहे. परेश रावल (Paresh Rawal) बॉक्सिंग कोचच्या भूमिकेत अगदीच खरेखुरे कोच वाटत आहेत. अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) खूपच सुंदर दिसत आहेत. तिची लहान मुलासोबत लहान होऊन धमाल करण्याची शैली लक्ष आकर्षित करते. एकंदरीत हा ट्रेलर पहिल्यानंतर चित्रपट पाहण्याची उत्सुकता नक्कीच वाढते. शिवाय अजीजच्या आयुष्यात असं नेमकं काय घडलं, ज्यामुळे त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली हे जाणून घेण्याची आतुरता देखील वाढते.

पाहा ट्रेलर :

(Farhan Akhtar, Mrunal Thakur, Paresh Rawal starrer Film Toofan Trailer review)

हेही वाचा :

बाळासाहेब ठाकरेंच्या नातवासोबत अफेअर आहे का? पूजा बेदीची मुलगी म्हणते, “आम्ही तर…”

‘प्रार्थना महत्वाची की प्रार्थनेचा आवाज?’, विचार करायला लावणारा ‘भोंगा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.