बाळासाहेब ठाकरेंच्या नातवासोबत अफेअर आहे का? पूजा बेदीची मुलगी म्हणते, “आम्ही तर…”

माझ्या आणि ऐश्वर्यच्या डेटिंगच्या चर्चांमुळे माझ्या जवळच्या लोकांमध्ये उत्सुकता वाढली होती, मात्र त्यात काहीही तथ्य नाही, आम्ही केवळ चांगले मित्र आहोत, असं उत्तर अलायाने दिलं आहे.

बाळासाहेब ठाकरेंच्या नातवासोबत अफेअर आहे का? पूजा बेदीची मुलगी म्हणते, "आम्ही तर..."
पूजा बेदी आणि कन्या अलाया

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे (Aaishvary Thackeray) आणि अभिनेत्री पूजा बेदी (Pooja Bedi) हिच्या मुलीचं अफेअर असल्याची चर्चा आहे. पूजा बेदीची मुलगी अभिनेत्री आलिया फर्निचरवाला (Aalia Furniturewalla) उर्फ अलाया एफ (Alaya F) ही चित्रपट निर्मात्या स्मिता ठाकरे (Smita Thackeray) यांचा मुलगा ऐश्वर्यसोबत डेटिंग करत असल्याचं बोललं जातं. दोघांमधील अफेअरच्या चर्चेविषयी विचारलं असता, अलायाने या अफवा धुडकावून लावल्या. आम्ही तर केवळ चांगले मित्र आहोत, असा दावा अलायाने केला. (Pooja Bedi Daughter Alaya F answers on dating rumors with Balasaheb Thackeray’s grandson Aaishvary Thackeray)

“या तर केवळ चर्चा”

“तुमच्याविषयी चर्चा होणं ही चांगली गोष्ट आहे. मात्र तुम्ही अशा अफवा गांभीर्याने घेण्याची गरज नसते. ऐश्वर्य हा माझा उत्तम मित्र आहे. तो अत्यंत प्रतिभावान मुलगा आहे. माझ्या आणि ऐश्वर्यच्या डेटिंगच्या चर्चांमुळे माझ्या जवळच्या लोकांमध्ये उत्सुकता वाढली होती, मात्र आता तेही अशा चर्चांना सरावले आहेत” असं उत्तर अलायाने ‘ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत दिलं.

“लॉकडाऊनमध्ये मी फक्त स्वतःचा विचार केला”

“माझ्या वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न येतो, तेव्हा मी माझ्या व्यावसायिक आयुष्याइतका त्याचा विचार करत नाही. वैयक्तिक जीवन हे नैसर्गिकपणे आकाराला येत जातं. तुम्ही दररोज स्वतःमध्ये प्रगती करण्याकडे लक्ष केंद्रित करायला हवं. लॉकडाऊनच्या काळात मी हेच केलं. मी फक्त स्वतःबद्दल विचार करत होते, इतर कोणाबद्दल नाही” असं अलाया हसत म्हणाल्याचं वृत्त डीएनएने दिलं आहे.

दुबईतील पार्टीला अलायाची हजेरी

अलाया आणि ऐश्वर्य हे अनेकदा एकत्र दिसले आहेत. स्मिता ठाकरे यांनी दुबईला ऐश्वर्यची बर्थडे पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला अलायाने हजेरी लावल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. अलायाने मात्र नेहमीच ऐश्वर्य हा आपला जवळचा फॅमिली फ्रेण्ड असल्याचं म्हटलं आहे.

Alaya F Aaishvary Thackeray

अलाया आणि ऐश्वर्य ठाकरे

“आमची कुटुंब अनेक वर्षांपासून संपर्कात

“हे फार सरधोपट वाटेल, पण खरंच आम्ही फक्त चांगले फॅमिली फ्रेण्ड्स आहोत. आमच्या आई एकमेकींना ओळखतात. माझे आजोबा कबीर बेदी ऐश्वर्यच्या आई स्मिता ठाकरे यांना ओळखतात. आमची कुटुंब खूप वर्षांपासून एकमेकांना चांगली ओळखतात. ऐश्वर्य मला खूप गमतीशीर वाटतो. खरं तर आमचे फोटो मीडियामध्ये आता एकत्र दिसायला लागले. त्यामुळे सगळ्यांना वाटतं की आमच्या दोघांमध्ये काहीतरी सुरु आहे. पण आम्ही अभिनय, डान्स असे अनेक क्लासेस फार पूर्वीपासूनच एकत्र करत आलो आहोत. पापाराझींनी तेव्हापासून आमचे फोटो काढले असते, तर त्यांच्याकडे मोठं कलेक्शन झालं असतं.” असा टोलाही अलायाने मारला.

संबंधित बातम्या :

‘बालिका वधू’तील छोट्या आनंदीचा हॉट अँड बोल्ड अवतार, फोटोशूट्समुळे नेहमीच असते चर्चेत

प्रचंड सुंदर आहे यामी गौतमची धाकटी बहीण, पाहा सुरीलीचे खास फोटो

(Pooja Bedi Daughter Alaya F answers on dating rumors with Balasaheb Thackeray’s grandson Aaishvary Thackeray)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI