AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral : बॉलिवूडच्या किंग खानला तिने गंडवलं, आली अन् किस करून गेली, पाहा व्हिडीओ

एका मित्राच्या रिअल इस्टेट ब्रँडच्या जाहिरातीसाठी शाहरूख गेला होता. या कार्यक्रमानंतर तो तेथे उपस्थित असलेल्या काही पाहुण्यांसह त्याच्या चाहत्यांना भेटत असताना एका चाहतीने त्याला किस केलं, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral : बॉलिवूडच्या किंग खानला तिने गंडवलं, आली अन् किस करून गेली, पाहा व्हिडीओ
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 14, 2023 | 8:34 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचा स्टार अभिनेता शाहरुख खानने त्याच्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यानं बॉलिवूडमध्ये एक से बढकर एक चित्रपट देत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज शाहरुख खानचा चाहता वर्ग लाखांहून अधिक आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. तसंच आता शाहरुख खानचा त्याच्या एका चाहतीसोबतचा एक किसींग व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नुकताच शाहरुख खान दुबईला त्याच्या एका मित्राच्या रिअल इस्टेट ब्रँडच्या जाहिरातीसाठी गेला होता. या कार्यक्रमानंतर तो तेथे उपस्थित असलेल्या काही पाहुण्यांसह त्याच्या चाहत्यांना भेटला. यावेळी शाहरुखला त्याची एक चाहती किस करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख खान काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे.  त्याच्यासोबत त्याची व्यवस्थापक पूजा ददलानी देखील दिसत आहे. त्यावेळी अचानक एक चाहता शाहरुखच्या हाताचे चुंबन घेतो आणि त्याला मिठी मारतो. त्यानंतर मागून एक महिला चाहती येते आणि ती थेट शाहरुखच्या गालावर किस करते. किस केल्यानंतर चाहती चांगलीच खूश होते. विशेष म्हणजे चाहतीनं किस करण्यापूर्वी शाहरुखला विचारलं की मी तुला किस करू शकते का त्यावेळी शाहरुख काही बोलण्यापूर्वीच ती त्याला किस करते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. तसंच या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स देखील केल्या आहेत.

सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांना या चाहतीचं हे कृत्य आवडलेलं नाहीये. यावेळी एका युजरनं म्हटलं आहे की, तिला तुरूंगात टाका. तर दुसऱ्यानं म्हटलं की, एखाद्या चाहत्यानं हेच कृत्य माधुरी किंवा करीनासोबत केलं असतं तर तो वाचला असता का?

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?