AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण, आलिया भट्टची इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण झालं आहे. चित्रिकरण संपल्यानंतर आलिया भट्टनं चाहत्यांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. (Filming of 'Gangubai Kathiawadi' completed, Alia Bhatt's emotional post on Instagram)

'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण, आलिया भट्टची इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट
| Edited By: | Updated on: Jun 27, 2021 | 1:26 PM
Share

मुंबई : आलिया भट्ट स्टार गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाची चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता आहे. चित्रपटाचा टीझरही काही दिवसांपूर्वी चाहत्यांसाठी रिलीज करण्यात आला आहे. आता संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाचं शूटिंग संपलं आहे. शूटिंग संपल्यानंतर आलिया भट्टनं चाहत्यांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

आलिया भट्टच्या (Alia bhatt) या चित्रपटाचं चित्रिकरण मुंबई फिल्म सिटी, गोरेगाव येथे झालं आहे. आता आलियानं काही फोटोंसोबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय.

आलियानं शेअर केली पोस्ट

आलियानं काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती संजय लीला भन्साळी तसेच चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत दिसतेय. आलियानं असंही लिहिलं आहे की आम्ही 8 डिसेंबर 2019 रोजी गंगूबाई काठियावाडी याचित्रपटाचं शूटिंग सुरु केलं होतं… आणि आता 2 वर्षानंतर चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. हा चित्रपट आणि सेट 2 लॉकडाउन आणि 2 वादळांमधून गेले आहेत .. मेकिंग दरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेता यांनाही कोरोनाची लागण झाली होती. सेटनं अनेक त्रासांचा सामना केला आहे तो एक वेगळा चित्रपटच  आहे.

पाहा पोस्ट

तिनं पुढे लिहिलं, मात्र या दरम्यान बरंच काही घडलं. हा आयुष्य बदलवणारा अनुभव आहे. संजय सरांनी दिग्दर्शिन केलेल्या चित्रटात काम करणं हे माझं स्वप्न होतं. महत्त्वाचं म्हणजे आज मी हा सेट एक वेगळी व्यक्ती म्हणून सोडत आहे. खूप प्रेम सर.. धन्यवाद… तुमच्यासारखा खरोखर कोणी नाही.

यासोबतच आलियानं पुढं असंही लिहिलं आहे की जेव्हा एखादा चित्रपट संपतो तेव्हा त्यातील एक भाग संपतो, म्हणून आज मी माझा एक भागही गमावला आहे. गंगू आय लव यू! तुझी आठवण येईल…

या एका पोस्टमध्ये आलियानं आपला दोन वर्षांचा संपूर्ण अनुभव चाहत्यांसमोर मांडला आहे. अशा परिस्थितीत भावनांनी परिपूर्ण असणारी आलिया भट्टची ही पोस्ट सोशल मीडियावर अधिकच लोकप्रिय झाली आहे. आलियाच्या या पोस्टवर चाहत्यांनाही जोरदार पसंती दर्शवली आहे.

संबंधित बातम्या

Angira Dhar : अंगिरा धर आणि आनंद तिवारी लग्नबंधनात, लग्नातील भावनिक क्षण सोशल मीडियावर शेअर

KRK : सलमान खाननंतर आता केआरकेचा कंगनासोबत पंगा, म्हणाला ”इमर्जन्सी’ चित्रपट होणार फ्लॉप…’

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.