AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Angira Dhar : अंगिरा धर आणि आनंद तिवारी लग्नबंधनात, लग्नातील भावनिक क्षण सोशल मीडियावर शेअर

अंगिरा आणि आनंदच्या लग्नात आनंद भावनिक होताना दिसला, अंगिरानं एक फोटो शेअर केलाय ज्यामध्ये ती पती आनंदचे अश्रू पुसताना दिसत आहे. (Angira Dhar and Anand Tiwari got married, shared some emotional moments of the wedding on social media)

Angira Dhar : अंगिरा धर आणि आनंद तिवारी लग्नबंधनात, लग्नातील भावनिक क्षण सोशल मीडियावर शेअर
| Edited By: | Updated on: Jun 27, 2021 | 12:24 PM
Share

मुंबई : अभिनेत्री अंगिरा धर (Angira Dhar) आणि अभिनेता-दिग्दर्शक आनंद तिवारी (Anand Tiwari) यांनी 30 एप्रिलला एका खासगी समारंभात लग्नगाठ बांधली आहे. लग्नाच्या दीड महिन्यानंतर दोघांनी आपल्या लग्नाचे काही फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांशी शेअर केलीये. आता अंगिरा लग्नाचे सुंदर क्षण शेअर करत आहे. आता तिनं आणखी एक सुंदर फोटो शेअर केला आहे महत्त्वाचं म्हणजे हा फोटो खूप खास आहे.

पाहा पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Angira Dhar (@angira)

लग्नात वधू अनेकदा रडत असते, मात्र अंगिरा आणि आनंदच्या लग्नात आनंद भावनिक होताना दिसला. होय, लग्नानंतर अंगिरानं तिच्या पाठवणीचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पती आनंदचे अश्रू पुसताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत अंगिरानं लिहिलं- ‘तुम्हाला कळतं की तुम्ही योग्य ठिकाणी आहात जेव्हा तुमच्या पाठवणीला तुम्ही नाही तर समोरचा व्यक्ती रडत असतो…’ दोघांचे हसरे चेहरे सांगत आहेत की ते एकमेकासाठी परफेक्ट आहेत.

विक्की कौशलनं दिल्या शुभेच्छा

विकी कौशलनंही हार्टच्या इमोजी पाठवत आपली प्रतिक्रिया दिली आहे. हर्लीन सेठीनंही दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. यापूर्वी अंगिरानं लग्नाचे आणखी दोन फोटो शेअर केले होते. यामध्ये, लाल लेहेंग्यात अंगिरा खूपच सुंदर दिसत आहे. सोबतच शेरवानी आणि पगडी घालून आनंद कमी देखणा दिसत नाहीये.

आनंदनं शेअर केली लग्नाची बातमी

लग्नाची बातमी पहिल्यांदा आनंदनं दिली होती. मंडपातून अंगिराबरोबर लग्नाचा फोटो शेअर करत त्यानं लिहिलं, ” 30 एप्रिलला, अंगिरा आणि मी आमच्या मैत्रीचं रुपांतर लग्नात केलं. यावेळी आमचे खास मित्र आणि कुटुंब उपस्थित होते. आता हळूहळू सर्वत्र अनलॉक होत आहे. त्यामुळे आमचा आनंदही आम्ही तुमच्यासोबत अनलॉक करतोय.”

पाहा फोटो

View this post on Instagram

A post shared by Anand Tiwari (@anandntiwari)

आनंद आणि अंगिराचे लोकप्रिय प्रोजेक्ट

बंदिश बंदिटस या लोकप्रिय सिरिजचं दिग्दर्शन आनंदनं केलं आहे. सोबतच अंगिरा धर विक्की कौशलसोबत नेटफ्लिक्सच्या लव्ह पर स्क्वेअर फूट चित्रपटात दिसली होती. लव्ह पर स्क्वेअर फूटनंतर अंगिराला लोकप्रियता मिळाली होती.

संबंंधित बातम्या

KRK : सलमान खाननंतर आता केआरकेचा कंगनासोबत पंगा, म्हणाला ”इमर्जन्सी’ चित्रपट होणार फ्लॉप…’

Photo : प्रियंका चोप्रानं ‘सोना’ रेस्टॉरंटमध्ये चाखली पाणीपुरी, शेअर केले खास फोटो

Photo : स्टायलिश आणि सुंदर, पाहा प्राजक्ता माळीचे काही खास फोटो

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.