Hansal Mehta: एका लग्नाची गोष्ट! ‘Scam 1992’चे दिग्दर्शक हंसल मेहता यांनी 17 वर्षांनंतर लिव्ह इन पार्टनरशी केलं लग्न

Hansal Mehta: एका लग्नाची गोष्ट! 'Scam 1992'चे दिग्दर्शक हंसल मेहता यांनी 17 वर्षांनंतर लिव्ह इन पार्टनरशी केलं लग्न
Hansal Mehta
Image Credit source: Twitter

'अखेर 17 वर्षांनंतर, दोन मुलं झाल्यानंतर, आमच्या मुलाला मोठं पाहताना आणि आमची स्वप्नं पूर्ण करत असताना अखेर आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला', असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 25, 2022 | 12:50 PM

निर्माता, दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी कॅलिफोर्नियातील सॅन्फ्रान्सिस्को याठिकाणी सफीना हुसैन (Safeena Husain) यांच्याशी लग्न केलं. सफीना आणि हंसल मेहता हे गेल्या 17 वर्षांपासून एकमेकांसोबत राहत होते. अखेर 17 वर्षांनंतर या दोघांनी लग्न (Marriage) करण्याचा निर्णय घेतला. अत्यंत साधेपणाने पार पडलेल्या या लग्नाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले. हंसल यांनी बॉलिवूडमधल्या अनेक पुरस्कार विजेते चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे, तर सफीना या मुलींच्या शिक्षणासाठी काम करतात. ‘अखेर 17 वर्षांनंतर, दोन मुलं झाल्यानंतर, आमच्या मुलाला मोठं पाहताना आणि आमची स्वप्नं पूर्ण करत असताना अखेर आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला’, असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे.

हंसल मेहता यांची पोस्ट-

‘अखेर 17 वर्षांनंतर, दोन मुलं झाल्यानंतर, आमच्या मुलाला मोठं पाहताना आणि आमची स्वप्नं पूर्ण करत असताना अखेर आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आयुष्यातील इतर गोष्टींप्रमाणेच हेसुद्धा कुठल्याही पूर्वनियोजनाशिवाय आणि उत्स्फूर्तपणे झालं. आम्ही एकमेकांना वचन दिलं होतं, पण या छोट्याशा समारंभासाठी ते कधीच बोलून दाखवलं नाही. अखेर प्रेम या सर्वांपेक्षा खूप महत्त्वाचं आहे आणि आमच्यात ते प्रेम आहे,’ अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

यावेळी हंसल यांनी कॅज्युअल टी-शर्ट, डेनिम आणि ब्लेजर परिधान केला होता, तर सफीना यांनी गुलाबी रंगाचा कुर्ता-सलवार परिधान केला होता. ‘मॉडर्न लव्ह’ असंही कॅप्शन देत आणखी एक फोटो पोस्ट केला. ‘मॉडर्न लव्ह’ या नावाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अँथॉलॉजीमधील एका एपिसोडचं दिग्दर्शन हंसल यांनी केलं होतं.

पहा फोटो-

‘शाहिद’, ‘ओमर्ता’, ‘सिटीलाईट्स’ यांसारख्या चित्रपटांमध्ये हंसल मेहता यांच्यासोबत काम करणारा अभिनेता राजकुमार राव याने या फोटोवर कमेंट करत शुभेच्छा दिल्या. ‘माझ्या सर्वांत आवडत्या कपलला शुभेच्छा. तुम्ही एकमेकांसाठी पूरक आहात’, असं त्याने लिहिलं. मनोज वाजपेयी यांनीसुद्धा शुभेच्छा दिल्या. ‘अलीगड’ या हंसल मेहतांच्या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली होती.

हंसल मेहता यांच्या सर्वांत गाजलेल्या ‘स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी’ या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या प्रतीक गांधीनेही कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या पत्नीला त्यात टॅग करत प्रतीकने लिहिलं, ‘हे खरंच खूप प्रेमळ आहे. प्रेरणादायी आणि थोडं दबाव टाकणारंही आहे. माझी पत्नी भामिनी ओझा माझ्याकडे आतापासूनच रागाने पाहतेय.’ अनुभव सिन्हा, विशाल भारद्वाज यांसारख्या दिग्गजांनीसुद्धा कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें