Happy Birthday  Abhijeet Bhattacharya | शाहरुख खानचा रोमँटिक आवाज बनून मिळवली प्रसिद्धी, ऐका अभिजित भट्टाचार्यची गाजलेली गाणी!

| Updated on: Oct 30, 2021 | 10:35 AM

अभिजीत भट्टाचार्य (Abhijeet Bhattacharya ) हा बॉलिवूडमधील प्रतिभावान आणि हिट गायकांपैकी एक आहे. अभिजीतने जवळपास 100 चित्रपटांमध्ये 6 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. 1990 च्या दशकात अभिजीतचे नाव लोकप्रिय गायकांच्या यादीत यायचे. ‘मैं कोई ऐसा गीत गाऊ’ आणि ‘वादा रहा सनम’ सारखी हिट गाणी त्यांनी दिली आहेत.

Happy Birthday  Abhijeet Bhattacharya | शाहरुख खानचा रोमँटिक आवाज बनून मिळवली प्रसिद्धी, ऐका अभिजित भट्टाचार्यची गाजलेली गाणी!
Abhijeet Bhattacharya
Follow us on

मुंबई : अभिजीत भट्टाचार्य (Abhijeet Bhattacharya ) हा बॉलिवूडमधील प्रतिभावान आणि हिट गायकांपैकी एक आहे. अभिजीतने जवळपास 100 चित्रपटांमध्ये 6 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. 1990 च्या दशकात अभिजीतचे नाव लोकप्रिय गायकांच्या यादीत यायचे. ‘मैं कोई ऐसा गीत गाऊ’ आणि ‘वादा रहा सनम’ सारखी हिट गाणी त्यांनी दिली आहेत.

देव आनंद यांच्या मुलाचे डेब्यू फिल्ममध्ये आरडी बर्मन यांनी अभिजीतला पहिला ब्रेक दिला होता. अभिजीतलाही या चित्रपटात त्यांचा आयडॉल किशोर कुमार यांच्यासोबत गाण्याची संधी मिळाली. पण हा चित्रपट फ्लॉप झाला आणि अभिजीतला पुन्हा कामासाठी संघर्ष करावा लागला.

त्यानंतर अभिजीतने आनंद मिलिंदच्या ‘बागी’ चित्रपटातील एक चंचल शोख हसीन, चांदनी रात है आणि हर कसम से बडी है या गाण्यांनी प्रसिद्धी मिळवली. यानंतर अभिजीतने मागे वळून पाहिले नाही. त्यांनी अनेक चित्रपटात हिट गाणी दिली आहेत. इतकेच नाही तर अनेक चित्रपटांमध्ये तो शाहरुख खानचा आवाज बनला आहे.

अभिजीतला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘येस बॉस’ चित्रपटातील ‘मैं कोई ऐसा गीत गाऊ’ या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार आणि स्क्रीन पुरस्कार मिळाला आहे. 2004मध्ये त्यांनी एमटीव्ही आशिया पुरस्कारही जिंकला आहे. अभिजीतच्या सर्वाधिक हिट गाण्यांमध्ये, ‘ये दिल्लगी’चे ‘ओले-ओले’, ‘मैं खिलाडी तू अनारी’ या चित्रपटाचे शीर्षक गीत आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’चे ‘जरा सा झूम लून में’  आणि ‘धडकन’ चित्रपटाचे शीर्षक गीत अशा अनेक हिट गाण्यांचा समावेश आहे. ऐका अभिजीतची काही सुपरहिट गाणी…

तौबा तुम्हारे ए इशारे

शाहरुख खानच्या आवाजातील लोकप्रिय अभिजीतचे ‘तौबा तुम्हारे ये इशारे’ हे गाणे किंग खान आणि राणी मुखर्जी यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. या गाण्यासाठी 2004 साली ‘झी सिने अवॉर्ड्स’साठी अभिजीतला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकासाठी नामांकन मिळाले होते.

मै कोई ऐसा गीत गाऊ

‘मैं कोई ऐसा गीत गाऊ’ हे गाणे गाऊन अभिजीतने प्रसिद्धी आणि नाव कमावले. ‘येस बॉस’ चित्रपटातील हे गाणे आहे. या गाण्यात शाहरुखसोबत जुही चावला होती.

रोशनी से

गुलजार यांनी लिहिलेले हे गाणे अभिजीतने अलका याज्ञिकसह गायले आहे. या गाण्यात शाहरुखसोबत करीना कपूर दिसली होती. या गाण्यासाठी अभिजीतला ‘झी सिने अवॉर्ड्स’साठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष म्हणून नामांकन मिळाले होते.

तुम्हे जो मैने देखा

शाहरुख खानचे आणखी एक हिट गाणे ज्यात अभिजीतने आपल्या आवाजाची जादू चालवली आहे. ‘मैं हूं ना’ या चित्रपटातील हे गाणे अभिजीतने गायले आहे.

हेही वाचा :

Rajnikanth Health Updates: सुपरस्टार रजनीकांतवर शस्त्रक्रिया, काही दिवस मुक्काम रुग्णालयातच

Rashmi Desai : जाळीदार ड्रेस परिधान करत रश्मी देसाईची धमाल, शॉर्ट स्कर्टमधील फोटो पाहून चाहते घायाळ