Happy Birthday Sanjay Mishra | वडिलांच्या निधनाच्या धक्क्याने अभिनय सोडून ढाब्यावर काम करू लागले होते संजय मिश्रा, वाचा अभिनेत्याबद्दल

| Updated on: Oct 06, 2021 | 7:10 AM

आपल्या कॉमिक टायमिंग आणि पात्रांनी बॉलिवूडमध्ये ठसा उमटवणारे अभिनेते संजय मिश्रा (Sanjay Mishra) यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1963 रोजी झाला. संजय मिश्रा या वर्षी 58 वर्षांचे होणार आहेत. संजय मिश्रा खरोखरच अष्टपैलुत्वाने समृद्ध आहेत.

Happy Birthday Sanjay Mishra | वडिलांच्या निधनाच्या धक्क्याने अभिनय सोडून ढाब्यावर काम करू लागले होते संजय मिश्रा, वाचा अभिनेत्याबद्दल
Sanjay Mishra
Follow us on

मुंबई : आपल्या कॉमिक टायमिंग आणि पात्रांनी बॉलिवूडमध्ये ठसा उमटवणारे अभिनेते संजय मिश्रा (Sanjay Mishra) यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1963 रोजी झाला. संजय मिश्रा या वर्षी 58 वर्षांचे होणार आहेत. संजय मिश्रा खरोखरच अष्टपैलुत्वाने समृद्ध आहेत. त्यांनी चित्रपटांमध्ये स्वतःचे मोठे नाव कमावले आहे. पण, संजयच्या आयुष्यात एक काळ असा होता, जेव्हा त्याने अभिनय सोडून एका ढाब्यात देखील काम केले होते.

हा तोच काळ होता, जेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. अभिनेते संजय मिश्रा वडिलांच्या खूप जवळ होते. वडिलांच्या निधनाने संजय मिश्रा पार कोलमडून गेले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर ते जवळपास बेपत्ताच झाले होते. आणि एकटेपणा त्यांना आतून पोखरत होता. त्यांना आजूबाजूच्या जगात काय सुरु आहे हे देखील काळात नव्हते. इतकेच काय तर, त्यांना परत मुंबईला जावेसे देखील वाटले नाही आणि त्यांनी अभिनय देखील सोडला होता.

आणि ढाब्यावर काम करू लागले संजय…

संजय मिश्रा अभिनय क्षेत्र सोडून गेले आणि पूर्णपणे एकटे पडले. एकटेपणा त्यांना खूप पोखरत होता आणि एक दिवस अचानक संजय मिश्रा घर सोडून ऋषिकेशला गेले. तिथे संजय मिश्रा एका ढाब्यावर काम करू लागले. संजय यांनी शंभराहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते, पण इतक्या चित्रपटांनंतरही त्यांना ते यश मिळाले नाही, ज्यासाठी ते पात्र होते. कदाचित याच कारणास्तव कोणीही संजय मिश्राला या ढाब्यावर ओळखू शकले नाही. असेच अनेक दिवस गेले आणि संजय मिश्रा यांचा वेळ भाजी बनवण्यात, ढाब्यावर आमलेट बनवण्यात गेला.

रोहित शेट्टीने केली मनधरणी

दिग्दर्शक-निर्माते रोहित शेट्टी नसता, तर संजय मिश्रा यांनी आपले संपूर्ण आयुष्य त्या ढाब्यावर काम केले असते. रोहित शेट्टी आणि संजय मिश्रा यांनी ‘गोलमाल’ चित्रपटात एकत्र काम केले होते. तो त्याच्या पुढील चित्रपट ‘ऑल द बेस्ट’ वर काम करत होता आणि त्या दरम्यान त्याला संजय मिश्राची आठवण आली. संजय मिश्रा चित्रपटात परतण्यास तयार नव्हते, पण रोहित शेट्टीने त्यांना राजी केले आणि त्याच्याकडून चित्रपट साईन करून घेतला. यानंतर संजय मिश्रा यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

चित्रपटांची रांग

संजय मिश्रा यांच्याकडे आजच्या काळात चित्रपटांची कमतरता नाही. रोहित शेट्टीच्या चित्रपटातून पुनरागमन केल्यानंतर त्यांच्याकडे चित्रपटांची रांगच लागली आणि त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. संजय मिश्रा यांनी ‘फस गया रे ओबामा’, ‘मिस टनकपूर हाजीर हो’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘मेरठीया गँगस्टर्स’ आणि ‘दम लगा के हैशा’ सारखे अनेक हिट चित्रपट केले आणि स्वतःची ओळख निर्माण केली. आजही प्रत्येकजण संजय मिश्रा यांचा चाहता आहे आणि त्यांच्या अभिनयाचे कौतुकही करतो.

हेही वाचा :

Sanak Trailer Launch : विद्युत जामवालच्या दमदार अ‍ॅक्शनसह चित्रपटाची कथाही जबरदस्त, पाहा ‘सनक’चा ट्रेलर

‘वहिनीसाहेब’ पुन्हा छोट्या पडद्यावर परतणार, अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या नव्या लूकमुळे चाहते उत्साही!