AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘वहिनीसाहेब’ पुन्हा छोट्या पडद्यावर परतणार, अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या नव्या लूकमुळे चाहते उत्साही!

धनश्रीने या आधी अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत पण आता ती एका पौराणिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. धनश्री मोठ्या गॅपनंतर प्रेक्षकांच्या भेटीस येतेय त्यामुळे तिची उत्सुकता शिघेला पोहोचली आहे.

‘वहिनीसाहेब’ पुन्हा छोट्या पडद्यावर परतणार, अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या नव्या लूकमुळे चाहते उत्साही!
धनश्री काडगावकर
| Edited By: | Updated on: Oct 05, 2021 | 3:24 PM
Share

मुंबई : आपण सर्वांनीच आपल्या लहानपणी आजीकडून किंवा आईकडून ‘एक आटपाट नगर होतं तिकडे एक साधुवाणी राहत होता’ या चातुर्मासाच्या गोष्टी ऐकल्या असतील, याच चातुर्मासातल्या कथा आणि व्रतवैकल्य प्रेक्षकांना मालिकारूपात ‘घेतला वसा टाकू नको’ या कार्यक्रातून पाहायला मिळतात आणि हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. या कार्यक्रमात नवरात्री विशेष भागात धनश्री काडगावकर (Dhanashri Kadgaonkar) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

धनश्रीने या आधी अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत पण आता ती एका पौराणिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. धनश्री मोठ्या गॅपनंतर प्रेक्षकांच्या भेटीस येतेय त्यामुळे तिची उत्सुकता शिघेला पोहोचली आहे आणि तिच्या चाहत्यांना देखील तिला पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत बघण्याची तितकीच उत्सुकता आहे.

मी देखील उत्सुक!

या भूमिकेबद्दल बोलताना धनश्री म्हणाली, “माझ्या मुलाच्या जन्मानंतर खऱ्या आयुष्यात आईची भूमिका निभावताना माझा अभिनयापासून संपर्क तुटला. मध्ये मोठा गॅप आल्यामुळे मला पुन्हा काम करता येईल की नाही, मी काही विसरली तर नाही ना अशा अनेक शंका माझ्या मनात येत होत्या. पण मला माझ्या कुटुंबाकडून आणि या मालिकेच्या नावातूनच खूप प्रोत्साहन मिळालं. घेतला वसा टाकू नको असं मी माझ्या मनाशी पक्के करून हि भूमिका स्वीकारली. या मालिकेमुळे दुर्गामातेची भूमिका माझ्या वाट्याला आली आहे. महिषासुराचा वध करणाऱ्या दुर्गा मातेची अलौकिक भूमिका माझ्या वाट्याला आली यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते.”

सोशल मीडियावर सक्रिय अभिनेत्री!

‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेमध्ये ‘नंदिता’ ही भूमिका साकारत अभिनेत्री धनश्री काडगावकर प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचली. धनश्रीने साकारलेली ‘नंदिता’ प्रेक्षकांना खूप आवडली. मात्र, मालिका यशाच्या शिखरावर असतानाच तिने या भूमिकेला अलविदा केला होता. अशावेळी तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, गोड बातमी कळताच प्रेक्षकांना खूप आनंद झाला होता. या वर्षीच्या सुरुवातीसच धनश्रीने बाळाला जन्म दिला आहे.

तिने आपल्या बाळाचे नाव ‘कबीर’ असे ठेवले आहे. धनश्री या काळात सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होती. प्रेग्नंसीच्या काळातले तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आले होते. धनश्रीच्या डोहाळे जेवणाचे फोटोही खूप चर्चेत आले होते.

धनश्रीची कारकीर्द

‘माझिया प्रियाला प्रित कळेना’ या मराठी मालिकेतून धनश्रीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. त्यानंतर ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘जन्मगाठ’ या मालिकेतूनही धनश्री प्रेक्षकांसमोर आली होती. मात्र, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून धनश्री घराघरात पोहचली. तिची ‘वहिनीसाहेब’ ही भूमिका चांगलीच गाजली. मालिका विश्वात सक्रिय असतानाच 2013मध्ये धनश्रीने दुर्वेशसोबत लग्नगाठ बांधली. आता खऱ्या आयुष्यातही एक नवी भूमिका सशक्तपणे सांभाळण्यास धनश्री तयार झाली आहे.

हेही वाचा :

Amruta Khanvilkar | ‘तुम सबसे हसीन….’, अमृता खानविलकरच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूटवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा!

Aryan Khan drug case : आता ड्रग्ज पार्टीप्रकरणात मुंबई पोलिसांची एण्ट्री, तर NCB ने ही तीन राज्यातील अधिकाऱ्यांची फौज मागवली

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.